Sankalp te Siddhi event BJP Chandrapur
Sankalp te Siddhi event BJP Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अकरा वर्षांच्या यशस्वी कारभारानिमित्त ‘संकल्प ते सिद्धी’ या उपक्रमांतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचणे नुसार भारतीय जनता पक्षाच्या वतीने चंद्रपूर येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली.
या कार्यशाळेमध्ये केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठीही या कार्यशाळेत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. BJP election planning meeting Chandrapur under Modi
कार्यशाळेचे उद्घाटन भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, प्रदेश कार्यकारिणीचे विशेष निमंत्रित सदस्य तुषार सोम,माजी नगरसेवक संजय कचर्लावार, रवि आसवानी, अॅड. सुरेश तालेवार, मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, रवी लोणकर, संदीप आगलावे, पुरुषोत्तम सहारे, सचिन कोतपल्लीवार, अरुण तिखे, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, बंटी चौधरी, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, शीतल कुळमेथे, रवी गुरनूले, संगीता खांडेकर,
कल्पना बबूलकर, पुरुषोत्तम राऊत, विनोद शेरकी, प्रमोद शास्त्रकार, प्रलय सरकार, चंदन पाल, राकेश बोमनवार, शीतल ईटनकर, मंजुष्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, मधुकर राउत, शालू कंनोजवार, धनराज कोवे, अमीन शेख, युवा मोर्चाचे यश बांगळे, अॅड. हरीश मंचलावार, सुभाष अदमाने यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Sankalp te Siddhi social welfare scheme discussion event
११ वर्षातील यशस्वी योजना
कार्यशाळेत मोदी सरकारच्या गेल्या अकरा वर्षांतील यशस्वी योजनांचा उल्लेख करण्यात आल्या. विशेषतः गरीब कल्याण अन्न योजना, पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री जनधन योजना आणि आयुष्मान भारत योजना या योजना प्रभावीपणे राबवून जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.या कार्यशाळेत चंद्रपूर शहरातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत केंद्र सरकारच्या कामगिरीची माहिती पोहोचवण्याचा आणि आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
