upcoming local body elections
upcoming local body elections : चंद्रपूर 20 जून – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी सुरु झाली असुन प्रभाग रचना आदेश तसेच मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेसंदर्भात राजकीय पक्षांची संयुक्त बैठक गुरुवार (19 जून) रोजी चंद्रपूर मनपा राणी हिराई सभागृहात घेण्यात आली.
आगामी निवडणुकांमध्ये वयाचे 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व पात्र मतदारास मतदार यादीत आपले नाव नोंदविणे शक्य व्हावे,सर्व पात्र मतदारांना मतदान करता येऊन मतदानाचे प्रमाण वाढावे यादृष्टीने केल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी निवडणुक निर्णय अधिकारी 71 – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र तथा उपविभागीय दंडाधिकारी संजय पवार, सहा. निवडणुक निर्णय अधिकारी 71 – चंद्रपूर विधानसभा क्षेत्र तथा तालुका दंडाधिकारी विजय पवार,मनपा आयुक्त विपीन पालीवाल,उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त संदीप चिद्रावार तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
शिक्षकांच्या वेतन प्रक्रिया बाबत आमदाराने अधिकाऱ्याला धरले धारेवर
प्रस्तावित प्रभागाची माहिती
आगामी निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे तयारी पुर्ण केली जात आहे. या बैठकीत शासनाकडून निर्गमित प्रभाग रचना आदेशावर सविस्तर करण्यात आली. नव्याने प्रस्तावित प्रभागांची माहिती, मार्गदर्शन तसेच नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यासाठी नियोजन या विषयांवर चर्चा झाली. ward restructuring for local elections
विशेष मोहीम
प्रशासनामार्फत मतदार जनजागृती व्यापक प्रमाणात होणार असुन येत्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, मतदारांची नावे वगळणे, स्थानांतर करणे तसेच नावात दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. या विशेष मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे व उपलब्ध संधीचा फायदा घेण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले. voter list update
निवडणुक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी सांगितले की, ‘मतदार यादी अद्ययावतीकरण ही लोकशाहीची मूलभूत प्रक्रिया आहे. सर्व पात्र नागरिकांनी आपली नोंदणी करून लोकशाही हक्क बजावणे आवश्यक आहे. या प्रक्रियेस जनजागृतीसाठी सर्व पक्षांनी सक्रीय सहभाग द्यावा.’ बैठकीदरम्यान सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पारदर्शक, सुसूत्र व शांततेपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
