cattle trafficking Maharashtra Telangana border । मोठी तस्करी उधळली! सीमावर्ती भागात चंद्रपूर गुन्हे शाखेचा सर्जिकल स्ट्राइक

cattle trafficking Maharashtra Telangana border

cattle trafficking Maharashtra Telangana border : चंद्रपूर – चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने गो तस्करांविरुद्ध मोठी कारवाई करीत तब्बल ५३ गोवंशीय जनावरांसहित १७ पीकअप वाहने, २४ आरोपी सहित एकूण १ कोटी ५२ लक्ष ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवरील चिखली खुर्द तपासणी नाक्यावर करण्यात आली.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेमुळे ३० कामगारांना मिळाला न्याय

मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यात गो तस्कर सक्रिय आहे, चंद्रपूरातून विविध मार्गाचा उपयोग करीत गोवंश जनावरे कत्तलीसाठी तेलंगाणा राज्यात नेण्यात येतात, मात्र यंदा स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे गो सत्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. Chandrapur cow smuggling news update

७ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने चिखली खुर्द नाक्यावर सापळा रचत नाकेबंदी केली, यावेळी अनेक वाहने संशयास्पद वाटली असता पोलिसांनी प्रत्येक वाहनांची झडती घेतली असता पोलिसांना एकूण १७ पीकअप वाहनात ५३ गोवंशीय जनावरे आढळून आली, सदर सर्व जनावरे हे कत्तलीसाठी तेलंगाणा राज्यात नेण्यात येत होती अशी माहिती पुढे आली.

५३ गोवंशाना अत्यन्त क्रूरपणे हात पाय व तोंड बांधून क्षमतेपेक्षा जास्त संख्येत वाहनात कोंबण्यात आले होते.

पोलिसांनी यावेळी २४ आरोपीना अटक केली असून पुढील तपास टेकमांडवा पोलीस करीत आहे. अटकेतील आरोपीमध्ये १ आरोपी तेलंगणा राज्यातील असून उर्वरित २३ आरोपी हे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील आहे. Major Police Action Against Cow Smugglers

हे आहेत आरोपी

२५ वर्षीय सचिन देवानंद नरोटे राहणार धानोरा, जिल्हा आदिलाबाद, तेलंगाणा, कृष्णा राम सुरवर, अलीम लतीफ सैय्यद, नितीन राजेंद्र नरोटे, माधव बजरंग पेंदीलवार, दिगंबर मारोती रुंजे, नंदकिशोर रावसाहेब ऐतवाड, देवराव उत्तम ताम्बरे, गोवर्धन किसन चव्हाण, विनोद किसन राठोड, दीपक रामनाथ नरोटे, अभिषेक प्रेमदास पवार, माधव गोबिंद पवार, उत्तम किसन राठोड, गोविंद प्रकाश पोले, अशोक अंकुश धुळगुंडे, विठ्ठल गोविंद मामीडवाड, विनायक रावसाहेब ऐतवाड, दानिश रसूल शेख, संतोष रामा थोरात, अजहर शाबीर शेख, प्रवीण किसन जाधव, अंकुश मारोती नरोटे, संतोष गुणाजी नरोटे, इंदल गणेश पवार.

सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल कचोरी यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि जगन्नाथ मडावी, स्वामीदास चालेकर, किशोर वैरागडे, गणेश भोयर, अजय बागेसार, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, चेतन गज्जलवार, जयसिंग, सुरेंद्र महतो, गणेश मोहुर्ले, प्रमोद कोटनाके, नितेश महात्मे, मिलिंद जांभुळे, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, प्रफुल्ल गारघाटे, प्रदीप मडावी, रवींद्र पंधरे, राहुल बनकर, सूरज अवथरे व मिलिंद टेकाम यांनी केली.

Leave a Comment