rambagh ground tree felling । 😡 “विकास” की विनाश?” रामबाग मैदानाच्या शेजारी 100 झाडांची निर्घृण कत्तल!

rambagh ground tree felling

मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनी संघर्ष समितीचे ‘वृक्षारोपण आंदोलन’

rambagh ground tree felling : चंद्रपूर : जि.प.च्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी 2 एकर जागा उपलब्ध असतांना नविन जागेवर जिल्हा परिषद इमारत बांधण्याचा हट्ट प्रशासनाने सोडला नाही. नागरिकांच्या दबावामुळे रामबाग मैदान सोडले.परंतु मैदानावरील 100 झाडांची कत्तल करून बांधकामाला सुरुवात केली.अत्यंत प्रदूषित अशा चंद्रपूर शहरात हिरवळीने नटलेल्या रामबाग मैदानाच्या शेजारील सुमारे 100 वृक्षांची युद्ध पातळीवर कटाई करून सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे काम सुरू केले. cutting 100 trees for government building

ताड, सिंधी व सागवानचे चाळीस-पन्नास वर्षापेक्षा जुने वृक्ष कापण्यात आली आहे. या प्रकारामुळे चंद्रपूर शहरातील नागरिक पुन्हा एकदा संतप्त झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त येत्या 22 जुलै रोजी सकाळी 8 वाजता नवीन जिल्हा परिषद इमारतीच्या प्रस्तावित जागेवर 100 वृक्षांची लागवड करून वृक्षतोडीचा निषेध करण्यात येईल अशी माहिती रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

कंत्राटदाराच्या हितासाठी प्रशासनाचा अट्टाहास
…..पप्पू देशमुख यांचा आरोप

जिल्हा परिषदेच्या नवीन इमारती करिता रामबाग मैदानावर खड्डा खोदण्यात आला. इमारतीचे बांधकाम थांबले परंतु खड्ड्यामुळे मैदानाला मोठे नुकसान झाले. यानंतर शहरातील जागरूक नागरिक, संघटना- संस्था, क्रीडा प्रेमी, खेळाडू, योगा ग्रुप्स सर्वांनी महापंचायत घेऊन या ठिकाणी बांधकामाला नागरिकांचा विरोध असल्याचा ठराव सर्वानुमते घेतला. स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी विनायक गौडा यांना महापंचायतच्या ठरावाची प्रत देण्यात आली. आता जिल्हा प्रशासनाने मैदान सोडले परंतु मैदाना शेजारची 100 जुनी वृक्षे अक्षरशः कापून काढली. ‘हा विकास नसुन ही विकृती आहे’,अशी संतप्त भावना देशमुख यांनी व्यक्त केली. green belt cutting for district council building

ऑनलाईन गेमिंगमुळे आत्महत्या वाढल्या, केंद्राकडे पाठपुरावा करणार – आमदार जोरगेवार

चंद्रपूर सारख्या अत्यंत प्रदूषित शहरात हिरवळ असलेले एकमेव मैदान असल्यामुळे रामबाग मैदान व त्यावरील नैसर्गिक सौंदर्याला सिमेंट काँक्रीटच्या विकासाचे नख लागू नये अशी जनभावना आहे. प्रस्तावित इमारतीची जागा बदलल्यास काम करण्यास विलंब होऊ शकतो. कंत्राटदारांचे काम लवकरात लवकर व्हावे, त्यातून चार पैसे आपल्या पदरी पडावे या एकमेव हेतूने प्रशासन आडमुठेपणाची भूमिका घेत आहे असा आरोप सुध्दा देशमुख यांनी केला. नवीन इमारतीचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या जुन्या परिसरामध्ये उपलब्ध असलेल्या दोन एकर जागेमध्ये स्थलांतरित करण्यात यावे या करिता रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचा लढा सुरू राहील अशी माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली.

Leave a Comment