Tadoba Women Facility Center । ताडोबात महिलांसाठी 6 सुसज्ज सुविधा केंद्रांचा शुभारंभ

Tadoba Women Facility Center

Tadoba Women Facility Center : चंद्रपूर : दिनांक १८ जुलै २०२५ रोजी, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (TATR) एकूण सहा ठिकाणच्या महिला सुविधा केंद्रांचे उद्घाटन गणेश नाईक, वनमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या हस्ते आभासी माध्यमातून संपन्न झाले. हे उद्घाटन मुंबई येथे पार पडलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संरक्षण फाउंडेशनच्या शासकीय मंडळाच्या बैठकीस संलग्न होते. tadoba tiger reserve women empowerment initiative

चंद्रपुरातील बोगस पत्रकार

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये श्री मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव (वन); श्रीमती शोमिता बिस्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (HoFF); श्री एम. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव); डॉ. प्रभुनाथ शुक्ल, वनसंरक्षक व क्षेत्र संचालक, ताडोबा; श्री आनंद रेड्डी, उपसंचालक (कोअर), ताडोबा; आणि श्री सचिन शिंदे, विभागीय वन अधिकारी, ताडोबा यांचा समावेश होता.

विविध सुविधायुक्त केंद्र

ही सुविधा केंद्रे ताडोबा (कोअर) विभागीय कार्यालयासह मोहर्ली, कोलारा, कोळसा, ताडोबा आणि कारवा या पाच कोअर विभागातील वन परीक्षेत्रांमध्ये स्थापन करण्यात आली आहेत. महिलांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायक वातावरण पुरवणाऱ्या या केंद्रांमध्ये कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष, स्तनपानासाठी विशेष जागा, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, विश्रांती क्षेत्र, स्वच्छतागृहे, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन यासह विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. women facility centers in tiger reserves

women facility centers in tiger reserves

हा उपक्रम महिला सशक्तीकरणाकडे आणि सर्व समावेशक व्यवस्थेकडे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाचे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात असून, महिला कर्मचार्‍यांना पाठिंबा देण्याच्या त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. क्षेत्र संचालक कार्यालयात असेच एक केंद्र यापूर्वीच कार्यरत असून, उर्वरित कार्यालयांमध्येही अशा सुविधा केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे.

Leave a Comment