village connectivity lost due to flood । ब्रह्मपुरी तालुक्यात पुराने ८ गावांना वेढले, जिल्ह्यातील ४६ मार्ग बंद

village connectivity lost due to flood

village connectivity lost due to flood : ब्रह्मपुरी – मागील ३ ते ४ दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे, यासह गोसीखुर्द प्रकल्पातून वैनगंगा नदीत सुमारे १५,१२७ क्यूमेक्स पाणी सोडल्यामुळे नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. पूरानं नदीकाठच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील गावांमध्ये पाणी शिरलं आहे. आरहेर-नवरगाव, पिंपळगाव, चिखलगाव या गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, धानाचे पीक (रोपे) खराब झाले आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. अवलगाव, रणमचान येथील घरांचेही नुकसान झाले आहे.

कोल वॉशरी बंद करा – आमदार जोरगेवार

बचाव पथकाला सतर्क ठेवण्यात आले असून, मदतीची गरज असलेल्यांसाठी पिंपळगाव येथे दोन बोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार सतीश मसाळ यांनी दिली.

ब्रह्मपुरी-वडसा, वालगाव-गंगाळवाडी, ब्रह्मपुरी-कान्हळगाव, ब्रह्मपुरी-चांदगाव, ब्रह्मपुरी-दुधवाही, ब्रह्मपुरी-परदगाव आणि ब्रह्मपुरी-गडचिरोली हे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. flood affected roads in chandrapur district

नदीकिनारी असलेली लाडज, पिंपळगाव भोसले, भालेश्वर, चिखलगाव, अरहेर नवरगाव आणि बेलगाव अशी गावं प्रभावित झाली आहेत. सध्या 14 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून गरज पडल्यास आणखीही लोकांना रेस्क्यू केल्या जाऊ शकतात. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने होत असून ब्रह्मपुरी तालुक्यातल्या अनेक नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मुडझा-गांगलवाडी आणि गांगलवाडी-आरमोरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यास तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. emergency rescue during floods

तालुका नियंत्रण कक्ष (control cell) स्थापन करण्यात आला आहे. कोणतीही व्यक्ती ०७१७७- २७२०७३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकते, असेही तहसीलदार सतीश मसाळ यांनी कळवले आहे.

जिल्हयात याठिकाणी मार्ग बंद

मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण ४६ मार्ग बंद झाले आहे. यामध्ये गोंडपिपरी तालुक्यातील ४ मार्ग, वरोरा तालुका १, ब्रह्मपुरी तालुका २६ मार्ग, नागभीड २ मार्ग, सावली तालुका १३ मार्ग, सदर मार्ग बंद झाल्यामुळे विविध गावातील संपर्क तुटला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात पुराचा धोका बघता प्रशासनाने त्याठिकाणी CDRF चे पथक तैनात केले आहे.

सुट्टी जाहीर

अतिवृष्टीमुळे अनुचित घटना घडू नये यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस यांना १० जुलै रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशाने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा सुट्टीचा आदेश ब्रह्मपुरी तालुका पर्यंत मर्यादित आहे. school holiday due to heavy rain today

Leave a Comment