Amma Chowk memorial violation
Amma Chowk memorial violation : चंद्रपूर : चंद्रपूर येथील महादेव मंदिर (मुळशीगोदाम) हे भारत सरकारद्वारे 11 एप्रिल 1925 रोजीच्या अधिसूचनेनुसार केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) नुसार, या मंदिराच्या परिसरात महानगरपालिकेच्या माध्यमातून अम्मा चौक स्मारकासाठी अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण झाल्याची तक्रार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून करण्यात आली होती. या अनुषंगाने, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.
चंद्रपुरात 18 वर्षीय मुलाची मफेड्रोन पावडर ची वाहतूक
नोटीसनुसार, प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे व अवशेष अधिनियम 1958 नुसार (Act 24 of 1958) या संरक्षित स्मारकाच्या 100 मीटरच्या परिसरात अनधिकृत बांधकाम, उत्खनन किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम (निर्माण) किंवा नूतनीकरण करण्यास सक्त मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षांपर्यंतचा कारावास आणि/किंवा 1,00,000/- (एक लाख) रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
7 दिवसाच्या आत अतिक्रमण हटवा
या प्रकरणी, भारत सरकारने, पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी, चंद्रपूर यांना, अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना, बांधकामाची प्रक्रिया थांबवून ७ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, जर ७ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवले नाही, तर स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने ते हटवण्यात येईल आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. Amma Chowk controversy
या नोटीसमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, जर संरक्षित स्मारकाच्या परिसरात कोणत्याही बांधकामाची दुरुस्ती (Repairs) करायची असेल, तर त्यासाठी सक्षम प्राधिकारी (Competent Authority) यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

या नोटीसमुळे, स्थानिक प्रशासनाने महादेव मंदिराच्या संरक्षित परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर आणि अतिक्रमणांवर लक्ष केंद्रित केले आहे. मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
