anganwadi centre new building inauguration
anganwadi centre new building inauguration : चिमूर – बालवयात शिक्षणप्रती गोडी निर्माण होऊन भविष्यात उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या कुटुंबासह गाव व समाजाचा विकास साधावा या उदात्त हेतूने प्रशासनाने प्रत्येक ग्राम स्तरावर अंगणवाडी केंद्रे कार्यान्वीत केले. ही केंद्रे बालकांच्या आरोग्यासह त्यांच्या मनावर उच्च संस्कार करणारे केंद्र ठरत असून अंगणवाडी हे पायाभूत बालसंकाराचे केंद्र आहे असे प्रतिपादन चिमूर विधानसभा क्षेत्र आमदार कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांच्या अर्धांगिनी अपर्णा भांगडिया यांनी केले. त्या चिमूर तालुक्यातील खडसंगी गट ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या बरडघाट येथील अंगणवाडीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
चंद्रपुरात प्रकल्पग्रस्त कामगारांचे वीरुगिरी आंदोलन
११.२५ लक्ष खर्चून उभारली नवी इमारत
चिमूर विधानसभा क्षेत्र आमदार कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांच्या विशेष प्रयत्नातून बरडघाट येथे अंगणवाडी नवीन इमारत बांधकामकरिता जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ११.२५ लक्ष खर्चून उभारण्यात आलेल्या इमारतीच्या आयोजित लोकार्पण सोहळ्या प्रसंगी प्रामुख्याने मेघाताई भांगडिया, मनिषाताई भांगडिया,चिमूर भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजप युवा मोर्चा महामंत्री रोशन बनसोड,खडसंगी सरपंच प्रियंका कोलते, संदीप बोरकर, अजहर शेख, प्रमोद श्रीरामे, सचिन मेश्राम, प्रभाकर दोडके,यांचेसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. anganwadi infrastructure rural development

यावेळी प्रास्ताविकातून क्षेत्र आमदार कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांच्या विकासात्मक दूरदृष्टीकोण व कर्तृत्ववान नेतृत्वाची महती सरपंच प्रियंका कोलते यांनी उपस्थितांपुढे सांगितली. कार्यक्रमाचे संचालन संजय भोयर यांनी केले. आयोजित लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
