Ballarpur Forest Guard Assault Case
Ballarpur Forest Guard Assault Case : बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर ३० वर्षीय वनरक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ५ ऑगस्ट रोजी घडली असून, आरोपी वनरक्षक सध्या फरार आहे.
अम्मा चौक वादावर आमदार जोरगेवार यांचं उत्तर
पीडित मुलगी कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मित्रासोबत चंद्रपूरहून गावाकडे दुचाकीने परत येत होती. रस्त्यात त्यांची दुचाकी बंद पडल्याने ते थांबले. याचवेळी चंद्रपूरहून कारवाकडे जाणारा वनरक्षक दुर्योधन तिथे थांबला. त्याने मुलीच्या मित्राला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत पैसे मागितले. त्यानंतर, ‘तुला पुढच्या गावापर्यंत सोडतो’ असे सांगून त्याने त्या अल्पवयीन मुलीला आपल्या गाडीत बसवले. forest guard assault case
गुन्हे दाखल, आरोपी पसार
आरोपीने तिला चंद्रपूर-जुनोना मार्गावरील जंगलात नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पीडितेने आपल्या मित्राला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर तो तिला घरी घेऊन गेला. पीडितेने आपल्या पालकांसह बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. Forest guard rape case Maharashtra
पोलिसांनी आरोपी वनरक्षकाविरुद्ध अप.क्र. ५९२/२५ नुसार भादंवि कलम ३०८(२), १३७(२), ६४(१), ६५(१) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची ओळख पटली असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा मोरे, पोहवा यशवंत कुमरे आणि मपोअं खडसे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
