Bhadravati APMC chairman no confidence motion
Bhadravati APMC chairman no confidence motion : भद्रावती : स्थानीक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून अविश्वास प्रस्तावाच्या हालचाली सुरु असताना अखेर आज (दि.७ ऑगस्ट) ला पंधरा संचालकांनी एकमताने सभापती भास्कर ताजने यांच्यावर अविश्वास प्रस्ताव पारित केला व ताजने यांना सभापती पदावरून पायउतार केले. आज दिनांक ७ ऑगस्ट ला स्थानिक बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत सदर प्रक्रिया पार पडली.
शिक्षणाच्या उजेडावर राजकारणाचा अंधार, अम्मा कि पढाई उपक्रम स्थगित
१५ मतांनी प्रस्ताव पारित
कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध गटांचे मिळून एकूण अठरा संचालक आहेत. भास्कर ताजने हे सभापती होते. मात्र संचालकांना विश्वासात न घेणे, नियमबाह्य कामकाज करणे व कारभारात पारदर्शकता नसल्याचे कारण पुढे करीत सर्व संचालकांनी मिळून एकमताने ताजने यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याचे प्रयत्न चालविले होते. व पंधरा मतांनी सदर प्रस्ताव पारित झाला तर दोन सभासद अनुपस्थित होते.
अविश्वास प्रस्ताव यशस्वी होईल या भीतीने ताजने यांनी आधीच राजीनामा दिला होता, हे विशेष.
कोणत्याही पक्षात प्रवेश घेण्यासंदर्भात कोणत्याही संचालकांवर अथवा सभापतीवर दबाव नव्हता. किंबहुना हा विषयच कधी कुणामार्फत बोलल्या गेला नाही. भास्कर ताजने यांनी सदर विषयाला घेऊन भाजपात प्रवेश घेण्यास नकार दिल्याने अविश्वास ठराव आणला असल्याचे बोलून स्वतःवरील दोषावर पांघरून घालण्यासाठी बनाव केला आहे. सदर अविश्वास कुणाच्या सांगण्यावरून झाला नसुन सर्व संचालकांच्या एकमताने पारित झाला आहे. यावेळी राजकीय पक्ष, गट आदी न बघता केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उन्नतीकरिता हा निर्णय घेण्यात आला. ताजने यांच्या बाजूने एकही संचालक नाही, यातूनच त्यांच्या विषयीची नाराजी उघड होते.
-गजानन उताणे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती]
मी बांधकाम सभापती असुन सुद्धा या अविश्वास प्रस्तावात सहभागी आहो, यात कोणताही पक्षपात नाही. ताजने यांच्या कारभारावरील नाराजीमुळेच सदर अविश्वास प्रस्ताव आणला. पुढील सभापतीची निवड रीतसर सर्व संचालक एकत्र बसून निर्णय घेऊ.
- राजु डोंगे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती]

