Chandrapur Dahi Handi utsav । चंद्रपूर नगरीत ‘भाऊंची दहीहंडी उत्सव’ आणि ‘भव्य वेशभूषा स्पर्धा

Chandrapur Dahi Handi utsav

Chandrapur Dahi Handi utsav : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना एक मोठा आणि उत्साहपूर्ण उत्सव अनुभवता यावा यासाठी ‘द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार’ यांच्या वतीने यावर्षी ‘भाऊंची दहीहंडी उत्सव’ आणि लहान मुलांसाठी ‘भव्य वेशभूषा स्पर्धा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या १७ ऑगस्ट २०२५ रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल मैदान, वरोरा नाका चौक, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे. हा उत्सव केवळ दहीहंडीपुरता मर्यादित नसून, यात लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धेची भर घालण्यात आली आहे.

१,५१,००० रोख रक्कम आणि एक चषक

दहीहंडीचा मुख्य कार्यक्रम सायंकाळी ४:०० वाजता सुरू होईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांसाठी प्रथम पारितोषिक म्हणून १,५१,००० रोख रक्कम आणि एक चषक ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक संघांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. Chandrapur costume contest for kids

चंद्रपुरातील १२०० आस्थापनांना मनपाची नोटीस

या कार्यक्रमासोबतच, ५ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी एक विशेष ‘भव्य वेशभूषा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे विषय भारतीय संस्कृती आणि भारतीय इतिहासातील महापुरुष असे ठेवण्यात आले आहेत. लहान मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता ही एक उत्तम संधी आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जातील, ज्यात प्रथम बक्षीस ५,०००, द्वितीय ३,०००, तृतीय २,००० आणि १० उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.

दोन्ही कार्यक्रमांच्या अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी कृपया ७९७२३६९०४५ या क्रमांकावर संपर्क साधावा. सदर कार्यक्रम खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहेत. आम्ही चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः  गोविंदा पथक व बालकांना या उत्साहात सहभागी होण्याचे आणि कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करते.

Leave a Comment