Chandrapur environmental Rakshabandhan
Chandrapur environmental Rakshabandhan : चंद्रपूर: इको-प्रो तर्फे लोहारा-मामला जंगलातील वृक्षांना राखी बांधुन, युवकांनी वन-वन्यजीव तसेच पर्यावरणाच्या संरक्षणसाठी सदैव तत्पर राहावे, पर्यावरण संरक्षणाकरिता कटिबध्द राहावे असा संदेश कार्यक्रमातुन मान्यवरांनी दिला. आज लोहारा-मामला वनक्षेत्रातील ‘अदानी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक असलेल्या वृक्षांना राखी बांधुन वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध महाविद्यालय एकत्रीत येत आयोजन करण्यात आले. यामध्ये एफईएस गर्ल्स महाविदयालय, सरदार पटेल महाविद्यालय, सुशीलाबाई मामीडवार महाविद्यालय सहभागी झाले होते.
वनहक्क दाव्याचे प्रकरण निकाली कधी काढणार?
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन शिंदे, विभागीय वन अधिकारी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प,कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी अभय बडकेलवार, इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी उपस्थित विद्यार्थाना मार्गदर्शन केले. यावेळी समाजकार्य महाविद्यालय चे प्रा डॉ किरणकुमार मनुरे, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, प्रा. अशोक बनसोड एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रज्ञ जुनघरे प्रा. योगेश निमगडे तसेच वनपाल उत्तम गाठले, वनरक्षक धनराज गेडाम, राजु मोहुर्ले, सुलभा उरकुडे, हिरकन्या सावसाकडे उपस्थित होते. Eco-Pro Rakhi to environment event Chandrapur colleges
चंद्रपूरकर नागरीकांनो सदैव तत्पर रहा
चंद्रपूर जिल्हा जंगलाचा जिल्हा असुन ‘वाघांचा जिल्हा’ ही नवी ओळख निर्माण झालेली आहे. या जिल्हयात वन-वन्यजिव या नैसर्गिक संपदेसह मोठया प्रमाणात खनिज संपत्ती सुध्दा आहे. जंगलाखाली असलेल्या कोळसामुळे येथील वन्यजीव समृध्द जंगलावर कोळसा खान प्रकल्पाचे संकट नेहमीच उभे राहते. आणी प्रश्न उभा राहतो तो येथील पर्यावरणाचा, प्रदूषणाचा, वाघासह अन्य वन्यप्राण्यांचा अधिवासाचा, त्यांच्या भ्रमणमार्गाचा, अपुऱ्या अधिवासामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढीचा म्हणुन येथील वन-वन्यजिवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी चंद्रपूरकर नागरीकांना सदैव तत्पर राहीले पाहीजे.
इको-प्रो सह अनेक पर्यावरणवादी संस्था-संघटनाच्या तसेच चंद्रपूरकरांच्या जनआंदोलनामुळे प्रस्तावीत अदानी कोळसा खानीचा प्रस्ताव नाकारला गेला होता. या आंदोलनाच्या स्मृती जपत, आपला नैसर्गीक वारसा पुढील पिढीला सुस्थितीत हस्तांतरण करता यावे, याची जाणीवजागृती सर्व घटकामध्ये यावी याकरिता दरवर्षी ‘इतिहासात डोकावुन, भविष्यातील पर्यावरणाची सुरक्षीतता करीता लढण्यास बळ मिळावे’ हा उद्देश लक्षात घेउन इको-प्रो संस्थेच्या वतीने मागील 17 वर्ष पासुन लोहारा-मामला जंगलातील ‘अदाणी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक असलेल्या वृक्षास राखी बांधुन चंद्रपूर शहरात वन-वन्यजीव व पर्यावरण रक्षणासाठी 2008-2009 साली प्रस्तावीत अदाणी कोळसा खाणीच्या विरोधात झालेल्या जन-आंदोलनाच्या स्मृतीना उजाळा दिला जातो. Chandrapur college students tie Rakhi to forest trees

या कार्यक्रमा दरम्यान लोहारा-मामला रोडवरील वनक्षेत्रातील ‘अदाणी गो बॅक’ आदोलनाचे प्रतीक असलेल्या वृक्षास राखी बांधण्यात आली. निसर्गाचे रक्षण करण्यास वनविभागासोबतच सामान्य नागरीक व गावकरी यांचे सुध्दा सहकार्य अपेक्षीत असुन आपल्या अवतीभवतीचे पर्यावरण व जैवविवीधतेच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहीजे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करीत स्मृतीना उजाळा दिला. विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता इको-प्रो चे अब्दुल जावेद, कुणाल देवगिरीकर, बंडू दुधे, सुमित कोहळे, राजू काहिलकर, सनी दुर्गे, सचिन धोतरे, रुद्राक्ष धोतरे आदीनी सहकार्य केले. Chandrapur environmental Rakshabandhan
