Chandrapur Metropolitan BJP Executive
Chandrapur Metropolitan BJP Executive : चंद्रपूर – चंद्रपूर महानगर भाजपच्या कार्यकारिणीच्या पदाधिकारी व सदस्यांची नावे अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी आज जाहीर केली. यामध्ये १०१ जणांची नावे असून त्यामध्ये अनेकांना पक्ष संघटनेचा अनुभव नाही. विशेष बाब म्हणजे या कार्यकारणीत यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकारी व सदस्यांना झुकते माप देण्यात आले आहे. Chandrapur BJP committee inexperience
अशी आहे कार्यकारणी
विधानसभा प्रमुख – दशरथसिंह ठाकूर, महिला विधानसभा प्रमुख – वंदना हातगावकर, महामंत्री – मनोज पाल, सविता दंडारे, रवींद्र गुरनुले, शाम कणकम, उपाध्यक्ष – राहुल घोटेकर, राजू गोलीवार, राजेंद्र अडपेवार (नाव घोषित होताच उपाध्यक्ष पदाचा राजीनामा), बलराम डोडानी, सुरेश तालेवार, प्रशांत चौधरी, विजय मोगरे, अनिल फुलझेले, विकास खटी, विजय पोहनकर. Chandrapur BJP new executive
सचिव – सलीम शेख, चंद्रशेखर देशमुख, प्रमोद शास्त्रकार, हरीश मंचलवार, अतुल रायकुंडलिया, अशोक आक्केवार, सुदामा यादव, पूनम तिवारी, राजेंद्र शास्त्रकार, भारती दुधाणी, विश्व्जीत शहा, कोषाध्यक्ष – अमोल शेंडे, प्रसिद्धी प्रमुख – रुपेश कोकावार, महिला मोर्चा प्रमुख – छबूताई वैरागडे, किसान मोर्चा प्रमुख – संजय बोरघाटे, युवा मोर्चा प्रमुख – मयूर हेपट, अनुसूचित जाती प्रमुख – विमल काटकर, अनुसूचित जाती प्रमुख – जितेश कुळमेथे, अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख – राशिद हुसेन, ओबीसी आघाडी – विनोद शेरकी, उत्तर भारतीय आघाडी – उग्रसेन मथुराप्रसाद पांडे
कायम निमंत्रित सदस्य
हंसराज अहिर, सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, अशोक जीवतोडे, मनोहर पाउणकर, आचार्य मनीष महाराज, संजय कंचर्लावार, तुषार सोम, विजय राऊत, खुशाल बोन्डे, प्रकाश देवतळे, राजेंद्र गांधी, प्रमोद कडू, राहुल पावडे, संदीप आवारी, रवी आसवानी, देवानंद वाढई आदींचा समावेश आहे.

भाजपच्या कार्यकारणीमध्ये मुनगंटीवार-जोरगेवार व अहिर यांच्या निष्ठावंतांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र प्रमुख पदाधिकारी मध्ये ज्यांना पक्ष संघटनेचा जरापण अनुभव नाही अश्याना संधी देण्यात आल्याने भाजपचे अनेक निष्ठावंत नाराज झाले आहे. ज्यांना पक्ष संघटनेचा चांगला अनुभव आहे त्यांना बाहेरून पाठिंबा अशी अवस्था तर ज्यांच्यामागे एकही कार्यकर्ते नाही अश्याना संधी अशी अवस्था भाजपच्या कार्यकारिणीची असून आगामी पालिकेच्या निवडणुकीत अनुभव नसलेली व अनुभवी कार्यकारणी चमत्कार करेल कि फटका बसणार हि तर येणारी वेळच सांगणार.