Chandrapur municipal warning water disruption । ⚠️ मोठी बातमी! ईरई धरण दुरुस्तीमुळे चंद्रपूरच्या या भागात पाणीपुरवठा खंडित

Chandrapur municipal warning water disruption

Chandrapur municipal warning water disruption : चंद्रपूर, 19 ऑगस्ट – ईरई धरणावर अचानक उद्भवलेल्या विद्युत कामकाजामुळे उद्या दिनांक 20 ऑगस्ट 2025 (बुधवार) रोजी चंद्रपूर शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत किंवा पूर्णपणे बंद राहणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांना याची पूर्वसूचना देण्यात येत असून, पाणीपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मोकाट जनावराचा हल्ला, महिलेचा मृत्यू

बाधित भाग पुढीलप्रमाणे –

  • 1) बाबूपेठ परिसर :
    लालपेठ, संविधान नगर, किरमे प्लॉट, बाबा नगर, नेताजी चौक, मराठा चौक, गुरुदेव चौक, बुरड मोहल्ला, मोटघरे प्लॉट, आंबेडकर चौक, पंचशील चौक, महादेव मंदिर, राधाकृष्ण चौक, विकास नगर.
    2) हिंगलाज भवानी टाकी परिसर :
    मा.सर, हिंगलाज भवानी टाकीतून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा विस्कळीत किंवा बंद राहील.


3) रयतवारी टाकी परिसर :
रयतवारी टाकीवरून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा विस्कळीत राहील.
श्याम नगर, इंदिरा नगर, राजीव गांधी नगर आदी परिसर बाधित होतील.


Leave a Comment