Chandrapur murders crime spike
Chandrapur murders crime spike : चंद्रपूर – चंद्रपूर शहरात आठवडाभरात २ हत्येच्या घटना घडल्याने गुन्हेगारी वृत्ती आता फोफावू लागली कि काय असे वातावरण तयार झाले आहे, गुन्हेगारांवर पोलिसांचा चक्र कमी झाला आहे असे या घटनांवरून दिसत आहे. जुलै महिन्याच्या शेवटी लहान भावाने मोठ्या भाची गोळी झाडून हत्या केली होती. त्या घटनेला आठवडा होत नाही तर अष्टभुजा वार्डात चौघांनी मिळून एकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी २ तासात आरोपीना अटक केली हे विशेष.
अनुभव नाही तरीही…चंद्रपूर भाजपची कार्यकारणी
प्रेम प्रकरणातून हत्या
४ ऑगस्ट रोजी रात्री ३ वाजता ३५ वर्षीय छोटू उर्फ मृणाल प्रकाश हेडाऊ याला मारहाण करीत खून केला अशी माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जात असताना पोलिसांनी आरोपीना पकडले अशी माहिती समोर आली आहे. चारही आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत अटक केली. सदर हत्याकांड हे प्रेम प्रकरणातून झाले अशी माहिती आहे. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
अष्टभुजा वॉर्डातील छोटू उर्फ मृणाल प्रकाश हेडाऊ याला आरोपी २६ वर्षीय सुमोहित उर्फ गोलू चंद्रशेखर मेश्राम, टिल्लू उर्फ अनिल रामाजी निकोडे, सुलतान अली साबीर अली व बबलू मुनीर सय्यद यांनी मारहाण करीत मृणाल हेडाऊ ची हत्या केली, मात्र मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावायची असा प्रश्न आरोपीसमोर उभा राहिला होता. आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना ते पोलिसांना गवसले आणि हे हत्याकांड उघडकिस आले. two murders in week

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व रामनगर चे पोलीस निरीक्षक आसिफ रजा शेख यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेड्वार, शिवाजी नागवे, पोउपनि विनोद भुरले, हिराचंद गव्हारे, अतुल राठोड, पोलीस कर्मचारी गजानन नागरे, जितेंद्र आकरे, लालू यादव, शरद कुडे, आनंद खरात, विनोद यादव, बाबा नैताम, मनीषा मोरे, रजनीकांत पुठ्ठावार, रवीकुमार ठेंगळे, इंदल राठोड, संदीप कामडी, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, आदींनी केली. प्रकरणाचा पुढील तपास सपोनि प्रशांत लभाने करीत आहे.