Chandrapur police mafedrone seizure 57 grams । चंद्रपूरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! ५७ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त

Chandrapur police mafedrone seizure 57 grams

Chandrapur police mafedrone seizure 57 grams : चंद्रपूर: चंद्रपूर पोलिसांनी अवैध अंमली पदार्थांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत रहमतनगर येथील एका कुख्यात गुन्हेगाराकडून ५७.२६० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) ड्रग्स पावडर जप्त करण्यात आली आहे. या ड्रग्जची किंमत ४ लाख १९ हजार १०० रुपये असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

वीरुगिरी आंदोलनाला यश

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शादाब अब्दुल रऊफ शेख (रा. रहमतनगर) नावाचा रेकॉर्डवरील गुन्हेगार आपल्या घरात मॅफेड्रॉन ड्रग्जची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे २२ ऑगस्ट रोजी पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्या घरावर छापा टाकला. NDPS Act Chandrapur arrest

५७.२६० ग्रॅम एम.डी. ड्रग्ज पावडर

छाप्यादरम्यान, पोलिसांना आरोपीकडे ५७.२६० ग्रॅम एम.डी. ड्रग्ज पावडर, दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ९१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट-१९८५ च्या कलम ८(क) आणि २१(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे, रामनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. आसिफराजा शेख यांच्यासह दोन्ही विभागांतील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना अंमली पदार्थांच्या धोक्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन समाजासाठी अत्यंत घातक असून, अशा गैरकृत्यांची माहिती मिळाल्यास चंद्रपूर पोलिसांच्या 7887890100 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Comment