Chandrapur police officers honored । चंद्रपूर गुन्हे शाखेतील उत्कृष्ट पोलीस अधिकाऱ्यांचा गौरव

Chandrapur police officers honored

Chandrapur police officers honored : चंद्रपूर – १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांचा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. वर्ष २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेतील सत्कारमूर्ती अधिकारी व अंमलदार कार्यरत आहे.

मध्यप्रदेश राज्यातून आली अवैध दारूची खेप, स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद गजानन भुरले यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर, मूल, घुग्गुस, गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध जनावर तस्करी कारवाईत एकूण २७८ गोवंश जनावरांची सुटका करीत एकूण ३ लाख ७५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरी व घरफोडीचे एकूण ३१ गुन्हे उघडकीस आणत चोरीस गेलेला सोन्या चांदीचा मुद्देमाल एकूण ८८ लाख ६९ हजार ९०० रुपये हस्तगत करीत महत्वाची कामगिरी बजावली. Chandrapur Police performing excellently

८५० बेपत्ता नागरिकांना आणले शोधून

स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक संतोष ज्ञानेश्वर निंभोरकर यांनी वर्ष २०२५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घरून निघून गेलेल्या, पळून व हरवलेल्या तसेच पळवलेल्या एकूण ८५० मुलं/मुली, महिला व पुरुष यांचा शोध लावत त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या सर्व आव्हानात्मक गुन्ह्याचा तपास अतिशय चपळतेने निंभोरकर यांनी केला. Chandrapur police achievements

crime branch

स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अंमलदार किशोर रतन वाकाटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बनावटी देशी दारू वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांची गोपनीय माहिती काढत एकूण ३ आयशर ट्र्क मधील बनावट दारूच्या ९३५ पेट्या किंमत ६२ लाख ७२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

chandrapur crime branch

या तीन उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देत गौरविण्यात आले.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात केली.

Leave a Comment