Chota Matka Tiger |छोटा मटका वाघ TTC उपचार केंद्रात दाखल

Chota Matka Tiger

Chota Matka Tiger : (28 ऑगस्ट 2025)चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (बफर) गंभीर जखमी वाघ T-126 ला यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आले आहे. खडसंगी वनपरिक्षेत्रातील कंपार्टमेंट क्र. ५१ मध्ये ही बचाव मोहीम राबवण्यात आली. वाघाला पुढील उपचारांसाठी चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC) मध्ये हलवण्यात आले आहे.

कोरपना तहसील कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण, दारू दुकानाविरुद्ध एल्गार

वाघाच्या झुंजीत सीएम जखमी

१२ मे, २०२५ रोजी ताडोबातील खडसंगी बफर परिक्षेत्रात T-126 आणि T-158 या दोन वाघांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. या लढाईत T-158 वाघाचा मृत्यू झाला, तर T-126 गंभीर जखमी झाला होता.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) आणि तांत्रिक समितीच्या शिफारशीनुसार, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी T-126 वाघाला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. मानवी-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि अनुचित घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

वनसंरक्षक आणि क्षेत्र संचालक श्री प्रभू नाथ शुक्ल आणि उपसंचालक (बफर) श्री आनंद रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शीघ्र कृती दलाने (RRT) सहायक वनसंरक्षक श्री. अनिरुद्ध ढगे यांच्या देखरेखीखाली ही बचाव मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान वाघाला कमीत कमी इजा होईल याची पूर्ण काळजी घेण्यात आली.

profile picture

Leave a Comment