employment generation 135 percent success । 🏆 2024 मध्ये चंद्रपूरची अभूतपूर्व झेप – CMEGP अंतर्गत रोजगार निर्मितीत रेकॉर्डब्रेक 135% यश

employment generation 135 percent success

employment generation 135 percent success : चंद्रपूर, दि. 22 : राज्यातील युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने शासनाने 1 ऑगस्ट 2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) सुरू केला. या योजनेत सन 2024-25 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या नेतृत्वात उल्लेखनीय कामगिरी करत 135.38 टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे.

गणेश मूर्ती विसर्जनासाठी चंद्रपुरात २५ कृत्रिम विसर्जन तलाव

उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी दिलेल्या अभिनंदन पत्रानुसार, चंद्रपूर जिल्ह्याची ही उद्दिष्टपूर्ती जिल्हा प्रशासनाचे सक्षम नेतृत्व जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या नेतृत्वात, यंत्रणेमधील प्रभावी समन्वय आणि अधिकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे. जिल्ह्यातील युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम मोलाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करण्यात आले असून 2025-26 मध्ये देखील या योजनेद्वारे अधिकाधिक युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment