indefinite hunger strike against liquor store । दारू दुकानाविरोधात बेमुदत आमरण उपोषण

indefinite hunger strike against liquor store

indefinite hunger strike against liquor store : चंद्रपूर (२७ ऑगस्ट २०२५)- चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित होण्यापूर्वी ३५० बार व देशी दारूचे दुकाने होते, दारूबंदी झाल्यावर अनेकांनी आपली दुकाने दुसऱ्या जिल्ह्यात स्थानांतरित केली होती, ७ वर्षांनंतर जिल्ह्याची दारूबंदी उठली आणि उत्पादन शुल्क विभागाने दारू दुकानाचा बेकायदेशीर परवाना वाटप करण्याचे काम सुरु केले. ७ वर्षांनी जिल्ह्यात तब्बल ७५० च्या वर दारू दुकानांची संख्या वाढली आहे.

त्या बेपत्ता अल्पवयीन मुलाचा मृतदेहच आढळला

असेच कोरपना मध्ये नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी देशी दारूच्या दुकानाला बेकायदेशीर ना हरकत प्रमाणपत्र देत गावातील वातावरण खराब करण्याचे काम केले असा आरोप कोरपना शहर वासियांनी केला. देशी दारू दुकान तात्काळ गावातून हटविण्यात यावे या मागणीकरिता शेतकरी संघटनेचे कोरपना तालुका उपाध्यक्ष पद्माकर नथ्थूजी मोहितकर २८ ऑगस्टपासून कोरपना तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहे. women safety concerns

दारू दुकानाविरोधात अनेक तक्रारी, प्रशासन गप्प

दारूचे दुकान हटवावे याकरिता संवैधानिक मार्गाने तक्रार, धरणे, मोर्चे व अनेक आंदोलने करण्यात आली मात्र त्याची साधी दखलही घेण्यात आली नाही. दारू दुकानांमुळे महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना व्यसन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दुकानांमुळे महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

मागण्या काय?

  • २८ मे रोजी नगर पंचायतीने दारू दुकानाला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे.
  • मुख्याधिकारी धुमाळ यांना निलंबित करावे.
  • अवैध बांधकामाची मोका चौकशी करून मुख्याधिकारी यांनी बांधकाम पूर्णत्वाचे दिलेल्या प्रमाणपत्राबाबत कारवाई करावी.

४ जुलै व २१ जुलै २०२५ रोजी महिला व पुरुषांच्या स्वाक्षरीनिशी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे तक्रार केली असून अद्यापही जिल्हाधिकारी यांनी कोरपना वासियांच्या तक्रारींवर कसलाही निर्णय घेतला नाही, याकरिता स्वतंत्र भारत पक्ष समर्पित शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष पद्माकर मोहितकर यांनी नागरिकांच्या तक्रारींवर शेवटचा लढा देण्यासाठी बेमुदत आमरण उपोषणाचे हत्यार उगारले असून २८ ऑगस्ट पासून तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात होणार आहे. जोपर्यंत दारूचे दुकान गावातून हटणार नाही तोपर्यंत माझा लढा सुरु राहणार अशी प्रतिक्रिया मोहितकर यांनी दिली आहे.

Leave a Comment