mephedrone trafficking Babupeth
mephedrone trafficking Babupeth : चंद्रपूर – शहरातील बाबुपेठ भागात चंद्रपूर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत अनेक कारवाया होत असून याचा अर्थ या भागात अंमली पदार्थाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला स्थानिक गुन्हे शाखेने २ युवकांना मेफेड्रोन पावडर सहित अटक करून तब्बल १ लाख ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला यावेळी आरोपीकडून एक धारदार चाकू सुद्धा जप्त करण्यात आला.
बाबुपेठमध्ये १९ वर्षीय मुलाला मेफेड्रोन ची वाहतूक करताना पकडले
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १४ ऑगस्ट रोजी बाबुपेठ भागातील गुरुदेव चौकात छापेमार कारवाई केली, पोलिसांना अंमली पदार्थ मेफेड्रोन ची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुदेव चौकात सापळा रचला असता त्यावेळी दुचाकी वाहनावर १९ वर्षीय चुन्नु महेश गुप्ता राहणार महाकाली कॉलरी वार्ड आणि दुसऱ्या वाहनावर २० वर्षीय हर्षित अशित टीकेदार राहणार नार्मल स्कुल वॉर्ड बाबुपेठ चंद्रपूर त्यावेळी चौकात आढळले असता दोघांना ताब्यात घेण्यात आले. Crime Branch catches mephedrone traffickers
अंमली पदार्थ सहित धारदार चाकू जप्त
दोन्ही आरोपीकडून ०४.४५० ग्राम मेफेड्रोन पावडर एमडी हे अंमली पदार्थ सहित धारदार चाकू व दोन दुचाकी वाहनसह १ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीवर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायदा व भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, चेतन गज्जलवार, सुरेंद्र महतो, सुमित बरडे, प्रफुल गारघाटे व मिलिंद टेकाम यांनी केली.
