police trace missing girl after six year । आई रागावली, मुलगी घरातून निघून गेली आणि तब्बल ६ वर्षांनी ती….

police trace missing girl after six year

police trace missing girl after six year : चंद्रपूर – आई रागावली आणि अल्पवयीन मुलीने रागाच्या भरात घर सोडले, आई ला वाटलं मुलगी सायंकाळी राग शांत झाल्यावर घरी येणार मात्र ती आलीच नाही, अखेर ६ वर्षांनी पोलिसांनी त्या मुलीला शोधून काढले. हि कुण्या चित्रपटाची कहाणी नसून चंद्रपुरातील सत्य घटना आहे.

अम्मा कि पढाई उपक्रमावर राजकारण, २८४ विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

२३ ऑगस्ट २०१९ मध्ये रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आईने रागावल्याने घरी कुणालाही न सांगता घरून निघून गेली होती. मुलगी घरी न आल्याने आई-वडिलांनी सर्वत्र शोध घेतला मात्र मुलगी कुठे आढळून आली नाही

अखेर आई-वडिलांनी याबाबत रामनगर पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी कलम ३६३ अंतर्गत गुन्हा दाखल करीत मुलीचा शोध सुरु केला. सातत्याने पोलिसांनी प्रयत्न करीत तब्बल ६ वर्षांनी त्या मुलीला शोधून काढले. ती मुलगी आता २२ वर्षाची झाली असून तिने सांगितले कि मी फिरण्याकरिता पुण्यात गेली होती मात्र नंतर लॉकडाऊन लागल्याने मी तिथेच अडकली होती. त्यानंतर ती मुलगी पुण्यात वास्तव्यास राहली. Chandrapur police missing girl 6 years later reunited

विशेष बाब म्हणजे रामनगर पोलिसांनी कसोशीने मुलीचा शोध घेत तिला आई-वडिलांकडे सोपविण्यात आले, मुलगी ६ वर्षांनी भेटल्याचा आनंद पालकांच्या चेहऱ्यावर होता त्यांनी रामनगर पोलिसांचे आभार मानले. सदरची यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक असिफ रजा शेख यांच्या नेतृत्वात सपोनि प्रज्ञा वाडेकर, पोलीस कर्मचारी पवन डाखरे, सीमा पोरेते, सुमेध मानकर व प्राजक्ता रांजणकर यांनी केली.

मिसिंग सेलचे यश

अपहरण झालेले व घरून निघून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी राज्यात स्वतंत्रपणे मिसिंग सेल स्थापन करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी उपविभाग व जिल्हा स्तरावर एकूण ८ मिसिंग सेल स्थापन केले, जिल्हा स्तरीय मिसिंग सेलचे नियंत्रण अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्याकडे आहे. २७ जुलै ते ६ ऑगस्ट या १० दिवसांच्या कालावधीत चंद्रपूर पोलिसांनी ६० मुले, मुली, महिला व पुरुषांचा शोध लावला. Chandrapur missing person cell success story

यामध्ये जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतील घरून निघून गेलेले, हरवलेले, मिसिंग झालेले २४ पुरुष, २७ महिला तर अपहरण व पळविलेल्या २ अल्पवयीन मुले व ७ अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले.मिसिंग सेल मार्फत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन शोध मुळे कुटुंबापासून विभक्त झालेल्याना त्यांच्या प्रियजनांकडे सोपविण्यात आल्याने पालकांच्या चेहऱ्यावर आनंद होता.

Leave a Comment