poor quality drain chamber collapsed
poor quality drain chamber collapsed : चंद्रपूर: चंद्रपुरात भ्रष्ट कारभाराची पोलखोल करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील जनता कॉलेज चौकातील सेव्हन स्टार बेकरीसमोर नुकतेच नालीवर बांधलेले चेंबर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोसळले. या दुर्घटनेत एका नागरिकाला गंभीर दुखापत झाली आहे.
१०५ वर्षे जुनी इमारत जमीनदोस्त, चंद्रपूर मनपाची कारवाई
भ्रष्ट कारभार
मिळालेल्या माहितीनुसार, या भागात काही दिवसांपूर्वीच नालीवर चेंबरचे बांधकाम केले होते. मात्र, हे काम इतक्या निकृष्ट दर्जाचे होते की, मंगळवारी एका ग्राहकाला थेट खड्ड्यात पडून दुखापत झाली.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या चेंबरच्या बांधकामात वापरले गेलेले साहित्य अत्यंत हलक्या दर्जाचे होते. त्यामुळे, एका व्यक्तीच्या वजनानेही ते चेंबर कोसळले. सामान्य नागरिकांच्या कराच्या पैशातून असे ‘कागदी बांधकाम’ करून त्यांच्या सुरक्षेशी खेळ केला जात आहे. municipal chamber collapse

या घटनेमुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. ‘या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना अजून कोणत्या पुराव्याची गरज आहे?’ असा सवाल नागरिक विचारत आहेत. या प्रकारच्या घटनांमुळे शहराच्या विकासाची दिशा आणि प्रशासनाची नैतिकता यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
चंद्रपूर मनपाचे स्पष्टीकरण काय?
जनता कॉलेज चौकातील सेव्हन स्टार बेकरीसमोर बांधण्यात आलेले चेंबर अचानक कोसळल्याने एका पादचाऱ्याला अपघात झाला. या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर तसेच काही स्थानिक माध्यमांमध्ये “सदर चेंबर हे चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे उदाहरण” म्हणून सादर करण्यात आले आहे.
मात्र, चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात येते की, ही माहिती पूर्णपणे अपुरी व दिशाभूल करणारी आहे. सदर रास्ता हा राष्ट्रीय महामार्ग असुन रस्त्याची देखभाल,दुरुस्ती ही त्यांच्या मार्फतच करण्यात येते. सदरील चेंबरचे बांधकाम हे मनपाने केलेले नसुन कुणामार्फत करण्यात आले आहे याची मनपाकडे नोंद नाही. त्यामुळे या घटनेचा महापालिकेशी कोणताही थेट संबंध नाही.
त्यामुळे घटनेची पूर्ण माहिती न घेता महानगरपालिकेला लक्ष्य करणे हा प्रकार चुकीचा असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच नागरिकांनी सोशल मीडियावरील अपुरी व दिशाभूल करणारी माहिती तपासून न पाहता प्रसारित करू नये, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.
