Sanatan Hindu culture oldest civilization
Sanatan Hindu culture oldest civilization : चिमूर – सुमारे ८०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे आशीर्वाद मागितला होता. मनुष्य आणि चराचरातील सर्व सजीव त्यांच्या सह जीवनाचा विचार हा आमच्या संतांनी मांडलेला आहे. भागवत सप्ताहाच्या निमित्ताने संतांनी सांगितलेल्या ईश्वरीय बोधकथेतून आपले जीवन समृद्ध होते. व आपली अध्यात्मिक परंपरा चिरकाल टिकून राहते. संपूर्ण विश्वात प्राचीन संस्कृती म्हणून सनातन संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती हीच आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले ते चिमूर येथे भांगडिया कुटुंबीयांकडून आयोजित भागवत सप्ताहाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. Chief Minister Devendra Fadnavis
महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती
आयोजित भागवत सप्ताहाच्या समारोपीय सोहळ्यास आदिवासी विकास विभाग मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री प्रा.अशोक उईके, माजी आमदार मितेश भांगडिया, आ. कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया, भागवत कथाकार संत राजारामजी महाराज, संत कृपारामजी महाराज,आ. किशोर जोरगेवार, आ. करन देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष रविंद्र शिंदे, व संचालक मंडळ, तसेच विविध विभागाचे अधिकारी ,चिमूर न. प.मुख्याधिकारी अर्चना वंजारी उद्योजक श्रीकांत भांगडिया, व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुण्य आत्मांनाच भागवत श्रावणाची संधी
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्य आत्मांनाच भागवत श्रावणाची संधी मिळते. आपल्या आध्यात्मिक परंपरेला भागवत समृद्ध करते. जगाच्या पाठीवर प्राचीन ज्या संस्कृतीला अधोरेखित केल्या गेले आहे. ती सातत्यपूर्ण संस्कृती म्हणजे सनातन हिंदू संस्कृती होय. चिमूर येथे भांगडिया परिवारा द्वारा आयोजित भागवत सप्ताहाच्या निमित्ताने आलेल्या संतांचे मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेकडून स्वागत करतो. तसेच या भागवत कथेच्या श्रवणाचा लाभ मला मिळाला त्याबद्दल मी भांगडिया कुटुंबीयांना धन्यवाद देतो. व त्यांचेकडून भागवताची सेवा अविरत सुरू राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असेही ते यावेळी म्हणाले.

आयोजित भागवत कार्यक्रमास राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच नागपूर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातून बहुसंख्येने भक्तगण व नागरिक उपस्थित होते.
