teacher beating students case । संतापजनक प्रकार, शिक्षकाने विद्यार्थ्यांना केली अमानुष मारहाण

teacher beating students case

teacher beating students case : ब्रह्मपुरी – तालुक्यातील मांगली गावात जिल्हा परिषद शाळेतील पहिल्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना School ची स्पेलिंग न सांगितल्याने शिक्षकाने छडीद्वारे अमानुष मारहाण केली, वर्गातील ७ ते ८ विद्यार्थ्यांच्या पाठीवर मारहाणीचे व्रण उमटले होते, १९ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला मात्र शिक्षकाच्या भीतीने मुलांनी पालकांना हा प्रकार सांगितला नाही. २० ऑगस्ट रोजी मुले शाळेत न गेल्याने पालकांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी शिक्षकाद्वारे केलेल्या मारहाणीची माहिती दिली.

२६० रुपये रोजीचे शिक्षक घडविणार विद्यार्थ्यांचे भविष्य, आप चे झोपा काढा आंदोलन

पालक संतापले

मिळालेल्या माहितीनुसार १९ ऑगस्ट रोजी शिक्षक वर्गात आले आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांना स्कुल ची स्पेलिंग विचारली मात्र त्यांना स्पेलिंग न आल्याने शिक्षकांचा राग अनावर झाला, त्यांनी मागे पुढे न बघता छडी द्वारे मुलांच्या पाठीवर मारण्यास सुरुवात केली. जर हि बाब घरी सांगितली तर शिक्षक पुन्हा मारतील अशी भीती विद्यार्थ्यांच्या मनात असल्याने त्यांनी सदर बाब घरी सांगितली नाही, मात्र दुसऱ्या दिवशी विद्यार्थी शाळेत गेले नसल्याने पालकांनी शाळेत का गेले नाही म्हणून विचारणा केली असता शिक्षकाने केलेल्या अमानुष मारहाणीची बाब मुलांनी पालकांना सांगितली व त्यांना पाठीवरील व्रण दाखविले. student beaten by teacher for spelling mistake

मुलांच्या पाठीवरील व्रण बघून संतापलेल्या पालकांनी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन गाठले मात्र काही राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे पालकांनी याबाबत तक्रार दिली नाही. मात्र काही पालकांनी सदर घटनेची माहिती गटशिक्षणाधिकारी माणिक खुणे यांची भेट घेत सदर घटनेबाबत माहिती देत शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली.

चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी सदर घटनेची दखल घेत सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांना आदेश दिले, याबाबत शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे यांनी माहिती दिली कि विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाण प्रकरण बाबत चौकशीचे आदेश २१ ऑगस्ट रोजी दिले आहे मात्र अद्यापही अहवाल प्राप्त झाला नाही, या घटनेची चौकशी सुरू झाली असून, अहवाल लवकरच सादर केला जाईल. जर अहवालात शिक्षक दोषी आढळला तर कारवाई होणार हे निश्चित.

Leave a Comment