utkrusht mahila manch rajura
utkrusht mahila manch rajura : राजुरा: महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या उत्कृष्ट महिला मंच, चंद्रपूर यांच्या वतीने राजुरा येथे नवीन शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले. साने गुरुजी सभागृह, देशपांडे वाडी येथे शेकडो महिलांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
गणेशोत्सव व ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी जारी केला आदेश
या कार्यक्रमाला उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्षा, सौ. छबुताई वैरागडे, सौ. साक्षी कालेकर, आकाशवाणी उद्घोषिका सौ. प्रज्ञाताई जीवनकर, शिक्षिका सौ. वैशालीताई कन्नमवार, सौ. सरीता मंगरूळकर आणि संघटिका सौ. अर्चना मंगरूळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बंद खजिन्याचे दालन
अध्यक्षीय भाषणात सौ. छबुताई वैरागडे यांनी सांगितले की, या मंचाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवून महिलांचा खरा विकास साधला जाईल. प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना सौ. प्रज्ञाताई जीवनकर यांनी प्रत्येक स्त्रीला “बंद खजिन्याचे दालन” म्हटले. त्या म्हणाल्या, “केवळ संधी देणाऱ्या व्यासपीठाची गरज असते आणि ती संधी उत्कृष्ट महिला मंचच्या माध्यमातून तुम्हाला मिळाली आहे. या संधीचा पुरेपूर उपयोग करून महिलांनी या स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करावे.” female empowerment stage inauguration

या सोहळ्यादरम्यान, वेशभूषा आणि उखाणे स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. उखाणे स्पर्धेत सौ. अलका गिरटकर (प्रथम), सौ. माधुरी खांडे (द्वितीय), आणि सौ. पूजा कवलकर (तृतीय) यांनी विजेतेपद पटकावले. प्रगती बुरले आणि प्रीती देवगिरकर यांना प्रोत्साहनपर पुरस्कार मिळाले.
ग्रीन साडी वेशभूषा स्पर्धेत पूजा बांगडे (प्रथम), प्रीती येरणे (द्वितीय), आणि स्वाती जयपूरकर (तृतीय) विजेत्या ठरल्या. तर अलका गिरटकर आणि किरण चन्ने यांना प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला. सर्व विजेत्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. inauguration ceremony
कार्यक्रमाला उत्कृष्ट महिला मंच, राजुराच्या सर्व संघटिका सौ. शुभांगी खोंड, सौ. सरिता मंगरूळकर, वैशाली कुईटे, ललिता पिंपळकर, संगीता हुकम, नीता बनकर, सविता रागीट, निर्मला बांगडे, सुषमा चन्ने, माया रागीट, ज्योती नगराळे आणि सर्व नवीन सदस्यांनी मोठी उपस्थिती दर्शवली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता बनकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन ललिता पिंपळकर यांनी केले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
