viral video of government employee playing cards । 🚨 चंद्रपूरमध्ये शासकीय कर्मचाऱ्याचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल!

viral video of government employee playing cards

viral video of government employee playing cards : चंद्रपूर – सरकारी कार्यालयांमध्ये कामचुकारपणाचे प्रकार नवीन नाहीत. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील पंचायत समिती कार्यालयातून समोर आलेला एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी आपल्या कामाच्या वेळेत, सरकारी संगणकावर चक्क पत्ते खेळताना दिसत आहे. एका जागरूक नागरिकाने हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चंद्रपूर भाजपची कार्यकारणी जाहीर, निष्ठावंत नाराज

नेमका प्रकार काय घडला?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भद्रावती येथील पंचायत समिती कार्यालयातील एक कर्मचारी आपल्या खुर्चीवर बसून आहे. त्याच्यासमोर असलेल्या सरकारी संगणकाच्या स्क्रीनवर पत्त्यांचा खेळ सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा कर्मचारी पूर्णपणे खेळात मग्न असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. एका तरुणाने हा व्हिडिओ चित्रित केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सरकारी कार्यालयात जनतेच्या कामाऐवजी असे प्रकार घडत असल्याने जनतेच्या मनात प्रशासनाबद्दल नाराजी आहे. government employee playing cards at work

माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ चर्चेत असतानाच…

काही दिवसांपूर्वीच माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानभवनात आपल्या मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. आता चंद्रपूरमध्येही असाच प्रकार समोर आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे सरकारी कार्यालयातील कामाच्या वेळेत होणाऱ्या गैरवापराबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेची प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे.

Leave a Comment