Virugiri andolan of project affected workers
Virugiri andolan of project affected workers : घुग्गुस – २३ ऑगस्ट रोजी थकीत वेतन व कामावर परत रुजू करण्यासाठी ८ प्रकल्पग्रस्त कामगारांनी विदर्भ मिनरल्स एन्ड एनर्जी कंपनीच्या आवारातील चिमणी वर चढून वीरुगिरी आंदोलन सुरु केले, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीतर आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त कामगार सामूहिक या चिमणीवरून उडी मारत आत्महत्या करणार व याची सर्वस्वी जबाबदारी कामगार आयुक्त व कंपनी व्यवस्थापनाची राहणार असा इशारा कामगारांनी दिला आहे.
स्पेलिंग न आल्याने शिक्षकाने विद्यार्थ्यांना केली अमानुष मारहाण
घुग्गुस मधील उसेगाव मध्ये वर्ष २००८ रोजी गुप्ता एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरु झाली होती, त्यापूर्वी कंपनीने प्रकल्प उभा करण्यासाठी परिसरातील गावातील जमिनीचे संपादन केले होते, यासाठी १०३ शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पात गेल्याने त्यांना गुप्ता एनर्जी कंपनीमध्ये स्थायी रोजगार देण्यात आला होता. वर्ष २०१५ ते १६ दरम्यान कंपनीने कामगारांना विश्वासात न घेता कंपनी बंद केली, वर्ष २०१७ ला कंपनी दिवाळखोर घोषित झाली. कंपनी बंद झाल्याने अनेकांचे वेतन थकीत राहिले, प्रकल्पग्रस्तानी नोकरीसाठी आमरण उपोषण सुद्धा केले मात्र कामगारांना न्याय मिळाला नाही.
कंपनीने आश्वासन पाळले नाही
NCLT न्यायालयाच्या निर्देशानुसार गुप्ता एनर्जी व्यवस्थापनाचे परिचलनाचे सर्व अधिकार आता विदर्भ मिनरल्स एन्ड एनर्जी कंपनीला देण्यात आले. कामगारांनी प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी याकरिता पत्रव्यव्हार केला होता, त्यावेळी कंपनीने कामगारांना रोजगार मिळेल असे आश्वासित केले होते, मात्र २ महिन्यापूर्वी सुरु झालेल्या कंपनीने कामगारांना दिलेल्या आश्वासनाला डावलून नवीन कामगार रुजू करण्यास सुरुवात केली. १०३ प्रकल्पग्रस्त कामगारांपैकी ६० ते ६५ कामगारांना व्यवस्थापनाने स्थायी कामगार म्हणून रुजू करणे गरजेचे असताना त्यांनी असे केले नाही, याकरिता विजयक्रांती कामगार संघटनेद्वारे प्रकल्पग्रस्तांनी विदर्भ मिनरल्स कंपनी गेटसमोर धरणे आंदोलन सुरु केले. Vidarbha Minerals & Energy
१७ ऑगस्ट पर्यंत प्रकल्पग्रस्तांना विदर्भ मिनरल्स एन्ड एनर्जी मध्ये स्थायी रोजगार द्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा कामगारांनी दिला होता, मात्र न्याय न मिळाल्याने प्रकल्पग्रस्त महेंद्र वडस्कर, भारत खनके, सुधाकर काळे, सुरेंद्र विके, रमेश सोनेकर, अनिल निखाडे, सुनील जोगी व उमाकांत देठे यांनी २३ ऑगस्ट ला मध्यरात्री २ वाजता कंपनी आवारातील १६५ मीटर उंच चिमणीवर चढत वीरुगिरी आंदोलन सुरु केले, सध्या कामगार ४५ मीटर उंचावर आहे. कामगारांनी प्रशासनाने आम्हाला आता तरी न्याय द्यावा अशी विनंती केली आहे, आम्ही भूमिपुत्र आपल्या रोजगारासाठी लढत आहो, खासदार व आमदार सह नागरिकांनी आम्हाला आमच्या आंदोलनाला सहकार्य करावे अशी विनंती केली आहे. Ghuggus project affected workers protest

प्रकल्पग्रस्त कामगारांनी यावेळी कामगार आयुक्तांवर आरोप केला कि आयुक्त यांनी नेहमी कंपनीची बाजू घेतली मात्र कामगारांना न्याय मिळावा अशी कधी भूमिका घेतली नाही, जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त कामगार या चिमणीवरून उद्या मारत सामूहिक आत्महत्या करू. प्रकल्पग्रस्तांच्या वीरुगिरी आंदोलनस्थळी अद्यापही पोलीस प्रशासन शिवाय कुणीही भेट दिली नाही.