welding laborers killed in road accident । काम संपवून परतत असताना दुर्दैवी अपघात – दोन तरुणांचा मृत्यू, एक जखमी

welding laborers killed in road accident

welding laborers killed in road accident : गडचिरोली/मूल (२६ ऑगस्ट २०२५) – आष्टी-मुलचेरा मार्गावर सोमवारी (२५ ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजता दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात लवकुश सदाशिव गोरडवार (२९, रा. घोसरी) आणि शुभम सखाराम वाकुडकर (२५, रा. बोंडाळा) या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अक्षय राजू वाकुडकर हा जखमी झाला आहे.

मुख्यमंत्री विरुद्ध अपशब्द, चंद्रपुरात निषेध आंदोलन

दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि

हे तिन्ही तरुण वेल्डिंगचे काम करत होते. सोमवारी ते मुलचेरा येथे आयुष वेल्डिंग दुकानाच्या मालकाच्या घरी कामासाठी गेले होते. काम संपवून ते दुचाकीने घोसरीकडे परत येत असताना आष्टीपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एका वळणावर त्यांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि ती झाडावर आदळली.

या अपघातात दुचाकीवरील तिघेही जण फेकले गेले. लवकुश गोरडवारचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम वाकुडकरला तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. या अपघातामुळे घोसरी, नांदगाव आणि बोंडाळा परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Comment