Chanda plastic shop penalty । चांदा प्लास्टिकमध्ये १५० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त, मनपा प्रशासनाची कारवाई

Chanda plastic shop penalty

Chanda plastic shop penalty : चंद्रपूर 22 सप्टेंबर – गोल बाजारातील चांदा प्लास्टिक या दुकानामध्ये 150 किलो प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याने चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाद्वारे सदर प्रतिष्ठानावर 5 हजार रुपये दंड ठोठावण्याची कारवाई करण्यात आली आहे.  

तो नरभक्षक बिबट्या जेरबंद, सिंदेवाहीत ८ वर्षीय मुलाचा घेतला बळी

   सोमवार 22 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे बाजारातील दुकानांची पाहणी सुरु असता गोल बाजारातील चांदा प्लास्टिक या दुकानामध्ये 5 पोते प्लास्टिक पिशव्या असल्याची माहिती उपद्रव शोध पथकास माहिती मिळाली. पाहणी केली असता एकुण 150 किलो प्लास्टिक पिशव्या आढळून आल्याने सदर साहित्य जप्त करण्यात आले असुन 5 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

गुप्त माहीती द्या ५ हजार बक्षीस मिळवा

 चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा सदर गुन्हा केल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोचविण्यात येत आहे. Chandrapur Municipal Corporation action

   एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. सदर कारवाई प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,भुपेश गोठे,शुभम खोटे, शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लीवार, पूनम समुद्रे यांच्याद्वारे करण्यात आली.   


Leave a Comment