Chandrapur Babupeth Women Meeting News
Chandrapur Babupeth Women Meeting News : चंद्रपूर २२ सप्टेंबर २०२५ – चंद्रपुर शहरातील विविध भागात सध्या महिला बचत गटांची संख्या जोमाने वाढत आहे, महिला आत्मनिर्भर व्हाव्या असा बचत गटाचा उद्देश्य असतो मात्र काही वेळा गटाच्या माध्यमातून राजकारणाचा डाव साधण्याचे काम होत असते, चंद्रपूर शहरातील बाबुपेठ भागातील महिला कांग्रेस अध्यक्ष चंदा वैरागडे यांच्या निवासस्थानी २१ सप्टेंबर रोजी बचत गटाची मिटिंग आयोजित केल्या गेली होती, सदर मिटिंग ची वेळ हि रात्री ८.३० ते ९.३० च्या दरम्यान वैरागडे यांच्या घरावरील छतावर सदर मिटिंग आयोजित केली मात्र काही वेळातच सिमेंट रेलिंग कोसळल्याने ३ महिला खाली कोसळल्या. यामुळे एकच खळबळ उडाली होती. Chandrapur Women SHG Political Discussion
घरबसल्या पैसे कमवायचे आहे? तर वाचा हि बातमी
महिला कांग्रेस अध्यक्ष व बचत गटाच्या अध्यक्षा चंदा वैरागडे ह्या मागील काही वर्षांपासून बचत गट चालवितात, त्या निमित्ताने त्या महिलांच्या मिटिंग आयोजित करीत असतात. २१ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी त्यांनी महिलांची बैठक आयोजित केली होती, या बैठकीत १५० ते २०० महिला उपस्थित झाल्या होत्या. वैरागडे यांच्या छतावर जागा होत नसल्याने त्यांनी शेजारी असलेले वैरागडे यांच्या घरावरील छताचा वापर महिलांना बसण्यासाठी केला होता, त्या छतावर सिमेंटच्या रेलिंग होत्या, काही वेळातच ती रेलिंग कोसळली आणि त्यासोबत ३ महिलाही खाली पडल्या. Roof Collapse Incident
अचानक घडलेल्या या घटनेमुळे बैठकीत उपस्थित महिला घाबरल्या, आणि तात्काळ त्या महिलांना रुग्णालयात पाठविण्याचे प्रयत्न करण्यात आले, महिलांना वेळेवर उपचार मिळाल्याने त्या बचावल्या मात्र इतक्या रात्री बैठक आयोजित केल्याने उपस्थित महिला संतापल्या होत्या, परिसरातील महिलानुसार जर बैठकीत उपस्थित झाले नाही तर गटातून काढून टाकणार त्यामुळे त्या महिला बैठकीत आल्या होत्या.
विशेष बाब म्हणजे सध्या या बचत गटाच्या बैठकीत कांग्रेस पदाधिकारी यांची उपस्थिती लाभत असल्याने आता हा महिलांचा बचत गट कि राजकीय गट या चर्चाना उधाण आले आहे, आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हि बैठक आयोजित करण्यात आली होती का? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
महिलांचे रक्षण करणे माजी जबाबदारी – चंदा वैरागडे
आमच्या बचत गटाची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती, पावसाचे दिवस असल्याने पायऱ्या ह्या सैल झाल्या होत्या, त्यामुळे महिलांचा पाय घसरला, त्यांना किरकोळ जखमा झाल्या, मात्र या घटनेमुळे माझी बदनामी करण्याचे षडयंत्र काहींनी चालविले, आम्ही चांगलं काम करीत आहो हे कुणाला पाहवत नाही आहे. आम्ही इतक्या वर्षात महिलांचे मोठे संघटन उभे केले त्यामुळे हि विरोधकांना खुपणारी बाब आहे. सर्व महिला सुरक्षित असून त्यांची रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही जागरूक असून त्यांचे रक्षण करणे माझी जबाबदारी आहे.
