Chandrapur crime news 2025 । पाथरी शाळेतील शौचालयात मतिमंद मुलीवर अत्याचार, दोन आरोपी अटकेत

Chandrapur crime news 2025

Chandrapur crime news 2025 : चंद्रपूर : मतिमंद मुलीवर गावाबाहेरील शाळेतील शौचालयात नेऊन सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना २१ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. सावली तालुक्यातील पाथरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत पाथरी पोलिसांनी दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांसह दोघांना अटक केली आहे.

तो नरभक्षक बिबट जेरबंद

तुलाराम तानाजी मडावी (२२), विक्की विनोद कोवे (२१) या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायधीशानी त्याची पोलिस कोठडीत रवानगी गेली आहे. तर दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.

संतापजनक

१८ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास पाथरी गावातील चार जणांनी पीडित अल्पवयीन मुलीला फुस लावून गावाबाहेर असलेल्या शाळेच्या परिसरात घेऊन गेले. तेथील शौचालयात तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर तिला गावात नेऊन सोडून दिले. ही बाब घटनेच्या चार दिवसानंतर म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी पीडित मुलीच्या आईच्या लक्षात आली.

पीडितेच्या आईने लगेच पाथरी पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी कलम (६४ (१), ६४ (२), (आय), ६४ (२) के, ६४ (२) एम, ७० (१), ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली. पुढील तपास पाथरी ठाणेदार नितेश डोर्लीकर करत आहेत.

Leave a Comment