Chandrapur disability welfare scheme
Chandrapur disability welfare scheme : चंद्रपूर 19 सप्टेंबर – दिव्यांगांना स्वयंरोजगार मिळावा व त्यामाध्यमातुन त्यांचे कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग कल्याण धोरणाची अंमलबजावणी केल्या जात असुन याअंतर्गत 34 दिव्यांग लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास एकुण 23.82 लक्ष रुपयांचे अनुदान आतापर्यंत देण्यात आले आहे.
अनेक दिव्यांग व्यक्तींना स्वतः चा व्यवसाय किंवा लघुउदयोग सुरु करायचा असतो परंतु अपुऱ्या भांडवलामुळे व्यवसाय सुरु करु शकत नाही अश्या दिव्यांग व्यक्तीकरीता चंद्रपूर महानगरपालिकेतील दिव्यांग कल्याण धोरण या योजनेतुन 2 लक्ष रुपयांचे कर्ज विविध बँकेमार्फत उपलब्ध करून दिल्या जाते. मनपा दिव्यांग कल्याण धोरण अंतर्गत बँकेने मंजुर केलेल्या कर्जावर 50 टक्के अनुदान देण्यात येते.
34 दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेचा लाभ
चंद्रपूर मनपाच्या माध्यमातुन आतापर्यंत 34 दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असुन त्यांना एकुण 23.82 लक्ष रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. ज्यास्तीत ज्यास्त दिव्यांग व्यक्तींनी व्यवसायाला सुरवात करून आत्मनिर्भर व्हावे व आपल्या कुटुंबाला हातभार लावुन आर्थिक प्रगती व्हावी हा या मागचा उद्देश आहे. divyang self employment assistance Chandrapur
ज्या दिव्यांग व्यक्तींना नविन व्यवसाय सुरु करावयाचा असेल अथवा सुरु असलेल्या व्यवसायात वाढ करावयाची असेल त्यांनी कर्ज घेण्याकरीता व अधिक माहितीकरीता मनपा दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय ( बीपीएल ऑफीस ),सरकारी दवाखान्यामागे,कस्तुरबा रोड ज्युबली शाळेसमोर या ठिकाणी कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे तसेच अधिकाधिक दिव्यांगांनी योजेनचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.