Chandrapur healthcare crisis
Chandrapur healthcare crisis : चंद्रपूर – प्राथमिक आरोग्य केंद्र ,ग्रामीण रुग्णालय जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेज हे फक्त दाखवावयाच्या भंपक भव्य इमारतीच्या नावावर उभे आहेत पण आरोग्य सुविधांच्या नावाखाली शून्य .
प्राथमिक आरोग्य केंद्रापासून मेडिकल कॉलेजच्या करोडोच्या इमारती उभ्या आहेत या सर्व इमारतींमध्ये सुविधांची वाणवा आहे संख्येच्या प्रमाणातडॉक्टर्स नाहीत इतर आरोग्य कर्मचारी नाहीत .औषधांचा पुरवठा नियमित आणि योग्य प्रमाणात नाही .कुठे एक्स-रे नाही कुठे इसीजी नाही.
चंद्रपूरची धन्यनेश्वरी दुनेदारचा जागतिक विश्वविक्रम
शेतकऱ्यांना साप चावला तर त्यावर एंटी स्नेक वेनम इंजेक्शन ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध नाही. कुत्रा चावल्यानंतर अँटी रॅबिज वॅक्सीन साठी ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये धाव घ्यावी लागते .नार्मल डिलिव्हरी साठी महिलांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून,ग्रामीण रुग्णालयांमधून जिल्हा सामान्य रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये रेफर केलं जाते आणि कॉम्प्लिकेशनच्या नावाखाली तिथूनही नागपूरला रेफर केले जाते. lack of doctors rural hospital
डायरेक्ट नागपूर रेफर
एक्सीडेंट मध्ये हेड इंजुरी झाली तर मग विचारूच नका डायरेक्ट नागपूर रेफर कारण चंद्रपुरात सिटीस्कॅन सुरू राहील याची गॅरंटी नाही .नावासाठी वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर सुरू होऊन आठ वर्षे झाली पण चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णांसाठी मिळणाऱ्या सुविधांमध्ये कुठलीही वाढ झाली नाही उलट जिल्हा सामान्य रुग्णालय बरे होते ही म्हणायची वेळ आता आलेली आहे. वैद्यकीय रुग्णालयातील अर्धे प्राध्यापक नागपूर वरून अपडाऊन करतात तर अर्ध्या जागा रिक्त आहे . स्वतः आरोग्य व्यवस्था वेंटीलेटर वर आहे अशी म्हणायची वेळ आली आहे.
चंद्रपूर गडचिरोली हा मागासलेला दुर्गम जिल्ह्याची ओळख आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेकडे इथल्या साताधाऱ्यांनी सतत दुर्लक्ष केल्यानंतर फक्त स्वतःची राजकीय पोळी शेकण्यासाठी “स्वस्थ नारी सशक्त परिवार “मेळावा आयोजित करून प्रधानमंत्री मोदी च्या वाढदिवसापासून करदात्याच्या पैशातून आरोग्यकेंद्रात राजकीय मंच तैयार करून जणू काही निवडणुकीच्या प्रचारासारखे भाषणं दिल्या जात आहेत. मुळातच दोन दोन दशक आपल्या भागातील जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जनप्रतिनिधीना स्वस्थ नारी शक्ती कशी तैयार होईल याचे भान तरी आहे काय हा प्रश्न जनतेस पडल्याशिवाय राहत नाही. political misuse of health funds
मुलींचे शिक्षणात मागासलेपण आणि त्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेले आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण या विषयाला कुठलाही राजकारणी हात घालत नाही. फक्त १५०० किवा २००० रुपये महिन्याला देऊन व लाडकी बहीण म्हणून होणार नाही. महिलांच्या आरोग्याच्या समस्येचे कारण गरिबी व कुपोषण आहे. घरकुल योजनेचा लाभ अनेकांना अजूनही मिळाला नाही. घरी बाथरूम आणि शौचालय नसल्यामुळे स्वच्छतेची हेळसांड झाल्यामुळे अनेक आजाराने व पोटाच्या विकाराने महिला त्रस्त आहेत. Chandrapur healthcare crisis
सार्वजनिक शौचालयाच्या सोयी ना शहरात उपलब्धत आहेत ना गावात! ग्रामीण पाणी पुरवठा ठप्प असल्यामुळे अनेक गावात स्वछ पिण्याचे पाणी नाही. चंद्रपुर जिल्ह्यात शिक्षणाचा व नोकऱ्यांचा पूर तर येऊ शकला नाही पण राजकीय वरदानामुळे १४ -१५ वर्षाची पोरं देखील दारूच्या महापुरात बुडाली आहेत. महिलांवर होणारे घरेलू अत्याचार आणि उपासमार यामुळे वाढले आहेत. सिंदेवाही ते चंद्रपूर व पोंभुर्णा तालुक्यात एकही स्त्रीरोगतज्ञ उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे, ब्लडबँक नसल्यामुळे फक्त रेफर केलेल्या गरोदर महिलाच नाही तर संपूर्ण परिवार जीवघेण्या अनुभवातून जातो. पण भंपकबाजी करणाऱ्या नेत्यांचे याकडे अजिबात लक्ष नाही. Chandrapur healthcare crisis
वाढत्या प्रदूषणामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे आणि कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे .
यासर्व बांबीवर जर समाधान द्यायचे असेल तर तर लाखो रुपयांची उधळपट्टी करून फक्त दिखावा करणारे हेल्थ कैंप करून व तिथे राजकीय भाषण करून होणार नाही तर बळकट राजकीय इच्छाशक्ती दाखवून कार्य करावे लागेल. पण मिशन च्या मागे न लागता कमिशन खोरी करणारे राजकीय नेते महिला स्वास्थय च्या बाबतीत गंभीर होतील काय असा खडा सवाल डॉ अभिलाषा गावतुरे यांनी केला आहे.
