Chandrapur Mahakali Temple Navratri 2025
Chandrapur Mahakali Temple Navratri 2025 : चंद्रपूर – आजपासून अश्विन नवरात्रीची सुरुवात झाली, चंद्रपुरातील ऐतिहासिक महाकाली मंदिरात घटस्थापना करण्यात आली, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी पहाटेपासूनच मंदिर परिसरात उपस्थिती दर्शविली होती. २२ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजताच मंदिर परिसरातील दालन उघडण्यात आले, गाभाऱ्यात जाऊन थेट दर्शन मिळणार यासाठी हजारो भाविक सकाळपासून रांगेत लागले होते.
मनसे तालुकाध्यक्षावर शिस्तभंगाची कारवाई करीत पदमुक्त
ऐतिहासिक काळातील गोंडराजा विरशाहची पत्नी राणी हिराईने सुमारे इ.स.१७०४ पुर्वी असलेल्या लहान मंदिराच्या मुळ बांधणीच्या चार खांबावर, पुर्वेस व पश्चिमेस जोडले. खांब तयार केल्यावर सध्याचे कमानयुक्त असणारे मंदिराचे बांधकाम करण्यात आले. राजा विरशाहाच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून राणी हिराईने चैत्रपोर्णिमेला महाकाली देवी उत्सवाची सुरवात केली. नांदेड येथील देवी उपासक राजाबाई देवकरिनस याने १८८० साली चैत्रपोर्णिमेला भक्तासोबत १५ दिवस उत्सवरूपी उपासना केली. Ashwin Navratri 2025 Chandrapur Updates
नवरात्रीमधील नियोजन काय?
महाकाली मातेच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक, जलाभिषेक केला जातो. मातेवर पारंपरिक दागदागिने चढवले जातात. यानंतर घटस्थापना केली जाते. नंतर दररोज देवीचा दुग्धाभिषेक, जलाभिषेक केला जातो. दुपारी नैवेद्य दाखवला जातो. तर, रात्री आरती केली जाते. अष्टमीला हवन केला जातो. हे अनुष्ठान नवमीपर्यंत सुरू असते.
यावेळी मंदिर व्यवस्थापनेतील मुख्य पुजारी यांनी माहिती दिली कि आजपासून सुरु झालेल्या अश्विन नवरात्रीमध्ये मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा केल्या आहे. दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना कसलीही समस्या उदभवणार नाही याची आम्ही काळजी घेत असल्याचे सांगितले. सोबतच नवरात्री दरम्यान आंध्रप्रदेश, मराठवाडा व इतर राज्यातून भाविक मोठ्या संख्येतून दर्शनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
