Chandrapur Swachhata Sankalp Din Activities | चंद्रपूर मनपा स्वच्छता जनजागृती अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

Chandrapur Swachhata Sankalp Din Activities

Chandrapur Swachhata Sankalp Din Activities : चंद्रपूर, दि. 22 सप्टेंबर – शासन निर्देशानुसार “स्वच्छता ही सेवा 2025” अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभर राबविण्यात येत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या सहभागातून तीनही झोनमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाची यावर्षीची थीम “स्वच्छोत्सव” असून सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, प्लास्टिक बंदी जनजागृती, सफाईमित्र सुरक्षा शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण व कचरा व्यवस्थापन जनजागृती अशा उपक्रमांवर भर देण्यात आला आहे.
झोन 1, 2 व 3 चे सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,संतोष गर्गेलवार व अनिलकुमार घुले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात हे उपक्रम हाती घेण्यात आले. Municipal Corporation Swachh Bharat Awareness

अश्विन नवरात्रीला आजपासून प्रारंभ, महाकाली मंदिरात घटस्थापना

झोन क्र. 1 अंतर्गत 

तुकुम, विवेकनगर, जटपूरा, वडगांव व नगीनाबाग या प्रभागांत जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा देणे, कचरा कुंडीचा वापर व परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हातठेले व फळ विक्रेत्यांना प्लास्टिक बंदी व कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात आली. रामनगर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मनपा कर्मचारी आरोग्य तपासणी शिबीर यशस्वीरीत्या राबविण्यात आले. मिनगाव व बाबूपेठ परिसरात वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली.

chandrapur mahanagarpalika

झोन क्र. 2 अंतर्गत – 

झोन कार्यालय इमारत व झोन क्र 2 अ व ब स्वच्छता विभाग कार्यालय,हनुमान खिडकी, दादमहल,गोलबाजार मार्केट व गंजवार्ड सब्जी मार्केट,पठाणपूरा गेट,अंचलेश्वर गेट,बिनबा गेट,मनपा प्राथमिक शाळा येथे स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला असुन पुढे झोन क्र 2 परिसरात प्लास्टीक बंदी बाबत जनजागृती अभियान राबविणे एक दिन एक घंटा या अंतर्गत रामाळा तलाव परिसरात स्वच्छता कार्यक्रम,- वेलफेअर पोग्रामबाबत कर्मचा-यांना माहीती देणे व जनजागृती करणे,राजीव गांधी उद्यान पठाणपूरा रोड येथे स्वच्छता व वृक्षारोपण कार्यक्रम,परिसरातील झेंड्याची स्वच्छता करुन परिसरातील नागरीकांमध्ये जनजागृती करणे, लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा येथे चित्रकला, निबंध व रांगोळी स्पर्धा,रस्ते/नाली सफाई अभियान, डिप क्लिनींग व शौचालय स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.  Urban Sanitation Awareness Programs Maharashtra

झोन क्र. 3 अंतर्गत –

 देशबंधू चित्तरंजन दास व मराठी प्राथ. शाळा दुर्गा कॉलनी रय्यतवारी येथे स्वच्छता अभियान घेण्यात आले. नेताजी चौक प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बायपास रोड-डंपिंग यार्ड ते आंबेडकर चौक व तेलगु शाळा समोरील मैदान परिसर येथे सकाळी वृक्षारोपण करण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांद्वारे स्वच्छता राखण्याची शपथ घेण्यात आली आहे.  पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा येथे निबंध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार असुन विविध धार्मिक ठिकाणी स्वच्छता कार्यक्रम व आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे.

तसेच सर्व झोन कार्यालयांद्वारे 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त “स्वच्छता संकल्प दिन” व भव्य साफसफाई मोहीमेचे आयोजन केले जाणार आहे. झालेल्या या सर्व उपक्रमांत मनपा अधिकारी, कर्मचारी, शाळा, स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. “स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी असून, स्वच्छतेतूनच सुंदर समाजाची निर्मिती होते,” असा संदेश या अभियानातून देण्यात आला.

Leave a Comment