Erai dam gates opened alert villages Chandrapur
Erai dam gates opened alert villages Chandrapur : चंद्रपूर (२ सप्टेंबर २०२५) – मागील २४ तासात चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे, जिल्ह्यातील अनेक मार्ग पावसामुळे बंद करण्यात आले असून, जिल्ह्यात एकूण सरासरी ५० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. इरई धरणाचे सातही दरवाजे उघडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील बोगस मतदार व ६१ लाख रुपयांचा वाली कोण?
१ सप्टेंबर रोजी सायंकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती, या पावसामुळे इरई धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने २ सप्टेंबर ला सकाळी ७ वाजता धरणाचे ३ दरवाजे १ मीटर ने तर ४ दरवाजे ०.७५ मीटरने उघडण्यात आले आहे.
इरई धरणाचे दरवाजे उघडल्याने या गावांना सतर्कतेचा इशारा
पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आणि इतर इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. असे आवाहन चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अनेक मार्ग बंद, प्रशासनाची बचाव मोहीम
कारवा-बल्लारपूर रोड वरील नाल्याला आलेल्या पुरामुळे १२ नागरिक अडकले होते, याबाबत बल्लारपूर प्रशासनाला माहिती मिळताच रात्री १२ वाजता तहसील कार्यालय बल्लारपूर मध्ये उपलब्ध असलेले बचाव साहित्य सोबत घेत कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुखरूपपणे कारवा मधील सोमाजी नाईक आश्रम शाळा मध्ये थांबण्याची व्यवस्था केली त्यांनतर तहसील कार्यालयाच्या वाहनाने नागरिकांना बल्लारपूर मध्ये पोहचविण्यात आले. Chandrapur heavy rain rescue operation update

मार्ग बंद
चंद्रपूर, धानोरा ते भोयेगाव मार्गावरील पुलावर पाणी आल्याने सदर मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे, मूल तालुका – फिस्कुटी ते चिचाळा नदी पुलावरून पाणी जात असल्याने सदर मार्ग बंद, चिरोली केळझर मार्ग बंद, चिंचोली गावाजवळील रेल्वे बोगद्यात पाणी असल्यामुळे काटवन ते मूल मार्ग बंद, काटवन ते मुल येण्याकरिता मारोडा हा पर्यायी मार्गाचा नागरिकांनी अवलंब करावा. वरोरा तालुका – कोसरसार ते बोडखा रस्ता बंद, अर्जुनी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने चारगाव ते खुर्द अर्जुनी मार्ग बंद, मौजा सुर्ला ते जामगाव बु मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद. भद्रावती तालुका – मौजा गुंजाला नाल्यावर पाणी जास्त वाढलेले असून नाल्या शेजारील काही घरात पाणी शिरलेलं आहे, मौजा गुंजाला कचराळा वाहतूक रस्ता बंद. Chandrapur musaldhaar rain impact villages

कोरपना तालुका – इरई भारोसा मार्ग बंद, भोयेगाव धानोरा मार्ग पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद करण्यात आला आहे. बल्लारपूर तालुका – पळसगाव-कवडजी मार्गावरील रंगीत यांच्या शेताजवळील पूल तीन फूट उंच पाण्याने डुबून असल्याने रहदारी बंद करण्यात आली आहे. इरई नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे मौजा चारवट माना चंद्रपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. काटवली ते बामणी मार्ग बंद.
