farmer death due to fallen power line । कोरपना तालुक्यात दुःखद घटना, वीज खांबाचे तार तुटून शेतकऱ्याचा मृत्यू

farmer death due to fallen power line

farmer death due to fallen power line : कोरपना ३ सप्टेंबर २०२५ – विद्युत खांबाचे तार तुटून शेताच्या तार कुंपणावर पडल्याने विद्युत करंट लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील रायपूर येथील शेत शिवारात मंगळवार दिनांक २ रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली.

पेंडाल वरून चंद्रपुरात वाद, मुनगंटीवार-जोरगेवार समर्थक आमनेसामने

तुकाराम रामचंद्र आत्राम (५५) रा. रायपूर असे मृतकाचे तर गीता अनिल आत्राम (४७) , प्रकाश रामचंद्र आत्राम (४५) , अशोक आत्राम (४७) रा. रायपूर अशी जखमींची नावे आहे. सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने विद्युत खांबाच्या विद्युत तारा शेताच्या तार कंपाउंड वर तुटून पडल्या होत्या.

कामासाठी शेतात गेले आणि..

सकाळी शेतात शेतकामासाठी गेले असता स्पर्श झाल्याने तुकाराम यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघा जखमींना बांबूच्या साह्याने जवळ असलेल्या नागरिकांनी विद्युत ताराच्या अलग केले. त्यामुळे सुदैवाने त्यांचे प्राण वाचवले. याबाबतची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह उर्वरत तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे पाठवण्यात आला. rural power line accident farmer killed

जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकन,नैताम , पोलीस कर्मचारी राठोड , आडे , नामदेव पवार करीत आहे. यावेळी मृतकाच्या परिवारांना खासदार प्रतिभा धानोरकर , माजी आमदार सुभाष धोटे , माजी आमदार वामनराव चटप यांनी भेट कुटुंबीयाचे सात्वन केले.

Leave a Comment