Male Leopard found dead । चंद्रपूरात नर बिबट्याचा रहस्यमय मृत्यू

Male Leopard found dead

Male Leopard found dead : चंद्रपूर : 9 सप्टेंबर 2025 – सावली वनपरिक्षेत्रांतर्गत मूल तालुक्यातील टेकाडी येथे सुनील गेडाम यांच्या पोल्ट्री फार्मलगच्या शेतात एक नर बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागामध्ये खळबळ उडाली आहे. स्थानिक वनरक्षकाच्या माहितीवरून त्याला जेरबंद करण्याची सर्व तयारी करण्यात आली असताना शोध मोहिमेदरम्यान तो मृतावस्थेत आढळून आला.

घराबाहेर भांडे घासत असताना महिलेवर वाघाचा हल्ला

सावली वनपरिक्षेत्रांतर्गत मूल तालुक्यातील टेकाडी येथे सुनील गेडाम यांच्या पोल्ट्री फार्मलगच्या शेतातील झुडपात एक बिबट दडून असल्याची माहिती स्थानिक वनरक्षकाला मिळाली त्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली. त्यावरून विभागीय वनाधिकारी तलमले, सहाय्यक उपवनसंरक्षक तरसे आणि सावली वनपरिक्षेत्राधिकारी धुर्वे यांचे नेतृत्वात बिबट्याला रेस्क्यू करून जेरबंद करण्याचे नियोजन करण्यात आले. Mul taluka leopard death

बिबट्याची शोधाशोध आणि…

याकरीता चंद्रपूर टी.टी.सी.चे डॉक्टर, अतिशीघ्र कृती दलाचे कर्मचारी, वनकर्मचारी आणि संजीवन पर्यावरण संस्था मूल चे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षितपणे पकडण्याचे नियोजन पूर्ण झाले. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम राबविण्यास सुरूवात झाली. वनविभागाच्या पथकाकडून बिबट्याची शोधाशोध सुरू असताना बिबट मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे वनाधिकाऱ्यांना धक्काच बसला. लगेच वरिष्ठांना माहिती देण्यात आली. त्यानंतर मृत बिबट्याला ताब्यात घेऊन सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले. त्या ठिकाणी डॉ. कुंदन पोडचलवार यांनी सहाय्यक उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या समक्ष बिबट्याचे शवविच्छेदन केले आणि त्या ठिकाणीच दहन करण्यात आले.

शवविच्छेदन वेळी डॉ. कुंदन पोडचलवार, क्षेत्र सहाय्यक एन.एस. सिडाम, वनरक्षक एस.डब्लू. बोनलवार, लंकेश आखाडे, अतिशीघ्र कृती दलाचे शूटर अविनाश फुलझेले, कीशोर डांगे, मनोज चावरे, अंकीत पडगेलवार, संजीवन पर्यावरण संस्था मूल चे उमेशसिंह झिरे, तरुण उपाध्ये, तन्मयसिंह झिरे, हौशिक मंगर, अक्षय दुम्मावार, टेकाडी पी.आर.टी. टीम व सहाय्यक वनमजूर उपस्थित होते. Chandrapur wildlife incident

याच परिसरात चार दिवसांपूर्वी ३०० कोंबड्यांना ठार करणारी मादी बिबट जेरबंद करण्यात आली होती. सध्या मृत अवस्थेत सापडलेला बिबट नर जातीचा आहे. नर आणि मादी बिबट दोघेही या परिसरात एकत्र वावरत असावेत असा वनविभागाचा कयास आहे. टेकाडी परिसर सादागडच्या घनदाट जंगलाच्या जवळ असल्याने येथे वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामुळे याच परिसरात नर मादी बिबट राहत असावेत असे अशी प्रतिक्रिया वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वन विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून, परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे आणि वन्यप्राण्यांची कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभागाला कळविण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment