Public anger over Chandrapur accident । भरदिवसा दुचाकीस्वार ठार, कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आपचे युवा जिल्हाध्यक्ष आक्रमक

Public anger over Chandrapur accident

पोलिसांनी आप युवा जिल्हाध्यक्षाची पकडली कॉलर

Public anger over Chandrapur accident : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या अपघाताची मालिका सुरु आहे, दोन दिवसात तीन नागरिकांचा मृत्यू तर ५ जण जखमी झाले आहे, या मालिकेत ३० सप्टेंबर रोजी बाबुपेठ भागातील जुनोना मार्गावर ३४ वर्षीय इसमाचा एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाला, यावेळी जुनोना मार्गावर काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मृतकाच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी पुढाकार घेतला मात्र पोलिसांनी त्यांची कॉलर पकडून ताब्यात घेतले.

कांग्रेसचे खड्ड्यात अनोखं आंदोलन

आज सायंकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान राकेश गौतम तेलंग हा आपल्या दुचाकीने घराकडे जात होता, त्यावेळी मार्गावर चारचाकी वाहन थार हे उभे होते अचानक त्या वाहनातील इसमाने दरवाजा उघडला, यामुळे राकेश चे दुचाकीवरील नियंत्रण सुटले असता त्याची दुचाकी थेट एसटी बसच्या मागच्या चाकात सापडली. राकेश सुद्धा दुचाकीसह मागच्या चक्क्यात सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. Chandrapur road accident protest

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आणि त्याठिकाणी ठिय्या आंदोलन सुरु केले, अपघाताबाबत माहिती मिळताच आप चे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे घटनस्थळी दाखल झाले, मृतकाच्या कुटुंबाला न्याय द्यावा व जुनोना मार्गावर गतिरोधक व्हावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली, जुनोना मार्गावर नागरिकांची चांगलीच गर्दी जमली. AAP leader detained Chandrapur protest

न्याय मागणाऱ्यांची कॉलर पकडली

रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र तोडगा निघाला नाही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने पोलीस निरीक्षक आसिफ रजा यांनी आप जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांची कॉलर पकडत त्यांना धक्काबुक्की करीत ताब्यात घेतले. एखाद्या गुन्हेगाराला नेल्यासारखं पोलिसांनी कृत्य केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. राजू कुडे म्हणाले कि काही वर्षांपूर्वी या मार्गावर बाप-लेकाचा अपघातात मृत्यू झाला होता, त्या दिवसापासून या मार्गावर गतिरोधकाचे निर्माण व्हावे अशी मागणी करीत आहो मात्र प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याने आज अपघात घडला. राकेश तेलंग नावाचा युवक जागीच ठार झाला, त्याच्या कुटुंबात गरोदर पत्नी, लहान मुलगी आई व भाऊ आहे, त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही आंदोलन केले मात्र पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत मला एखाद्या गुन्हेगारासारखे ताब्यात घेतले.

याबाबत पोलीस निरीक्षक आसिफ रजा यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Leave a Comment