Rahul Balamwar MNS Chandrapur
Rahul Balamwar MNS Chandrapur : चंद्रपूर/ब्रह्मपुरी – चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात संघटना वाढीचे काम जोमात सुरु आहे, मात्र संघटन वाढीमध्ये अडथळा व पक्षाच्या हितास बाधा आणणारे विरुद्ध बालमवार यांनी शिस्तभंगाची कारवाई करीत पदावरून हकालपट्टी केली आहे.
चंद्रपूर भाजपात गटबाजीचे ग्रहण
मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्याकडे वरोरा, चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी आहे, या भागात मनसेचे काम व संघटन वाढी चांगली सुरु आहे, ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष सूरज शेंडे यांनी पक्षविरोधी काम केल्याने बालमवार यांनी शेंडे याना पदमुक्त केले आहे. तसे पत्र आज २१ नोव्हेम्बर रोजी बालमवार यांच्याकडून जारी करण्यात आले आहे.
तात्काळ पदमुक्त
पक्षविरोधी काम करण्याच्या कृतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमी आक्रमक असतात, जर कुणी पक्षाच्या हिताला बाधा पोहचेल असे काम केल्यास त्याला सरळ घरचा रस्ता दाखवा असे आदेश आहे. त्या आदेशाला अनुसरून मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष सूरज शेंडे यांना तात्काळ पदमुक्त केले आहे. पक्षासोबत प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनसे नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र विरोधात काम केल्याने तात्काळ कारवाईचा बडगा शेंडे यांच्यावर पक्षाच्या वतीने बालमवार यांनी उगारला आहे.