Rahul Gandhi press conference evidence । राहुल गांधी यांची पत्रकार परिषद दिल्लीत आणि गोंधळ चंद्रपूर जिल्ह्यात

Rahul Gandhi press conference evidence

Rahul Gandhi press conference evidence : चंद्रपूर – देशाचे लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी आधी मतचोरी व आता मतदारांची नावे वगळणे व नव्याने नावे वाढविण्यात आल्याबाबत पत्रकार परिषद घेत पुरावे सादर केले. गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर चंद्रपूर जिल्हा प्रशासनात अनेक हालचाली सुरु झाल्या व थेट आमच्यामुळेचं बोगस मतदार नोंदणी टळली असे स्पष्टीकरण राजुरा मतदार नोंदणी अधिकारी रविंद्र माने यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे. Rahul Gandhi press conference evidence

चंद्रपूर मनपाला मिळाला नवा आयुक्त

राजुरा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ६ हजार ८६१ बोगस मतदार नोंदणी करण्यात आली होती. विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर छायाचित्र मतदार यादीस 06 ऑगस्ट 2024 रोजी प्रारूप आणि दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतीम प्रसिध्दी देण्यात आलीदिनांक 01 सप्टेंबर 2024 पासून सर्व विधानसभा मतदार संघात निरंतर मतदार नोंदणी संबंधाने अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात आली होती. निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 70 – राजूरा विधानसभा मतदार संघामध्ये 01 ते 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये नव्याने मतदार नोंदणी संदर्भात 7592 अर्ज प्राप्त झालेfake voters Rajura constituency

सहामतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदारराजूरा यांनी सदर अर्जाची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत चौकशी केलीचौकशीअंती एकूण 6861 अर्जामधील अर्जदार, संबंधित यादीवरील पत्यावर नसणे /अर्जदार अस्तित्वात नसणे अर्जदारांचे फोटो व पुरावे नसणे इत्यादी कारणावरून उपरोक्त अर्जरितसर नामंजूर करण्यासाठी परवानगी मिळण्याकरिता जिल्हा कार्यालयास 17 ऑक्टोबर 2025 रोजी प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर सदर वाढीव बोगस मतदारांची नावे वगळण्यात आली होती.

fake voters rajura

याबाबत प्रशासनाने १९ ऑक्टोबर रोजी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपी विरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 व विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते मात्र तक्रारीला आज जवळपास १ वर्षे होत आहे, परंतु या प्रकरणी अजूनही तपास सुरु आहे. सदर प्रकरणाचा तपास झाला नाहीतर कांग्रेस पक्ष न्यायालयात जात दाद मागणार अशी माहिती माजी आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे, वर्ष २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे देवराव भोंगळे यांनी कांग्रेसचे सुभाष धोटे यांचा ३ हजार ५४ मतांनी पराभव केला होता. Rajura election controversy

विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने १८ सप्टेंबर ला अधिकृत निवेदन जारी केले त्यामध्ये प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बोगस मतदार नोंदणी टळली अशी माहिती देण्यात आली.

फोन कट

यावर जिल्हाधिकारी विनय गौडा यांचेशी संपर्क साधत या प्रकरणी माहिती विचारली असता ते म्हणाले कि याबाबत आम्ही रीतसर प्रेस रिलीज केलेली आहे, सध्या पोलीस विभाग याचा रीतसर तपास करीत आहे, प्रश्नाने याबाबत पोलीस तक्रार केली होती त्याच काय झालं? ते म्हणाले कि आम्ही पोलीस विभागाला रिमाइंडर केलं आहे, तपासाला जवळपास वर्षे पूर्ण होत आहे मात्र अद्याप काही झालं नाही यावर जिल्हाधिकारी यांनी बोलणे टाळले आणि फोन कट केला. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी यावर काही प्रतिसाद दिला नाही. bogus voter registration

आयपी एड्रेस बाबत संभ्रम

राजुरा विधानसभा मतदार संघात झालेली बोगस मतदार नोंदणी मध्ये अनेकांची नावे हि बाहेर राज्यातील होती. आम्ही तहसीलदार यांना तक्रार दिली त्यानंतर बोगस मतदारांची नावे वगळण्यात आली मात्र त्यानंतर सुद्धा राजुरा विधानसभेत ११ हजार नावे बोगस होती ती प्रशासनाने वगळली नाही, हा प्रकार राजुरा विधानसभेत घडला तसा राज्यातील विविध मतदारसंघात घडला असेल हे नक्की आहे. याबाबत आम्ही पोलीस प्रशासनाशी बोललो कि हि नोंदणी कुणी केली तर ते म्हणतात कि आम्हाला निवडणूक आयोगाने आयपी ऍड्रेस दिला नसल्याने आम्ही काही करू शकत नाही अशी प्रतिक्रिया माजी आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे.

असा प्रकार घडला नाही

राजुरा विधानसभेचे आमदार यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हणाले कि मतदार यादीत काही मते वाढविण्याचा प्रकार घडला होता त्यावेळी आमच्या पक्षातील अध्यक्षाने तक्रार केली तेव्हा प्रशासनाने सदर नोंदी यादीमधून काढून टाकली होती मात्र त्यावेळी मतदारसंघात नवीन मते नोंदणी व वगळण्याचा कसलाही प्रकार झाला नाही, यावर निवडणूक आयोग आपली अधिकृत माहिती देणारच.

Leave a Comment