revenge killing after prison release |दीड वर्ष पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला अटक, बल्लारपूर पोलिसांची शिताफी

revenge killing after prison release

revenge killing after prison release : बल्लारपूर ३ सप्टेंबर २०२५ – पोलिसात तक्रार करीत कारागृहात पाठविले म्हणून १९ वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला बल्लारपूर पोलिसांनी दीड वर्षांनी अटक केली आहे. घटना घडल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता, मात्र पोलिसांनी हार न मानता आरोपीला अटक केली.

अवैध मोबाईल टॉवर विरोधात शिवसेनेच्या आंदोलनाला यश

वर्ष २०२१ रोजी १९ वर्षीय अनामिका उर्फ रक्षा भालचंद्र कांबळे च्या तक्रारीवरून २९ वर्षीय सिनु उर्फ आकाश लक्ष्मण दहागावकर राहणार महाराणा प्रताप वार्ड बल्लारपूर याला अटक करीत पोलिसांनी कारागृहात पाठविले होते. वर्ष २०२४ मध्ये कारागृहातून बाहेर आल्यावर सिनु च्या मनात अनामिका बाबत राग होता, त्याने त्याचा बदला घेण्याचे ठरवीत, सिनु ने अनामिकाला आपल्या घरी बोलावीत तिच्या डोक्यावर अवजड वस्तूने प्रहार करीत तिची हत्या करीत घटनास्थळावरुन पसार झाला होता.

बल्लारपूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध घेतला मात्र सिनु पोलिसांच्या हाती लागला नाही, घटनेपासून आजपर्यंत आरोपी विविध राज्यात ठिकाण बदलवित लपून राहत होता, आरोपी वारंवार पोलिसांना गुंगारा देत असल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करणे बंद केले नव्हते. arrest of accused in revenge killing after prison release

नातेवाईकाकडे आला आणि अडकला

बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून बिपीन इंगळे यांनी पदभार स्विकारत, अनामिका कांबळे हत्याकांडातील आरोपीला तात्काळ अटक व्हावी यासाठी सूचना व मार्गदर्शन केले. वर्ष २०२४ मध्ये पसार झालेल्या सिनु च्या अटकेचा दिवस २०२५ मध्ये उजाडला. आरोपी हा तेलंगणा मधील आपल्या नातेवाईकाकडे येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली, सापळा रचत अत्यंत शिताफीने पोलिसांनी आरोपी सिनु ला अटक करीत त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने ८ सप्टेंबर पर्यंत आरोपीची पोलीस कोठडी मंजूर केली. police track down fugitive after years on the run

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक बल्लारपूर बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात सपोनि मदन दिवटे, सपोनी शब्बीर खान पठाण, पोलीस कर्मचारी रणविजय ठाकूर, आनंद परचाके, संतोष पंडित, सुनील कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे, संतोष दंडेवार, सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, भास्कर चिंचवलकर, सचिन अल्लेवार, शरदचंद्र कारुष, खंडेराव माने, सचिन राठोड, मिलिंद आत्राम, लखन चव्हाण व शालिनी नैताम यांनी केली.

Leave a Comment