worlds smallest woman record । चंद्रपूरची धन्यनेश्वरी दुणेदार – ‘Smallest Woman in the World’ म्हणून जागतिक कीर्ती!

worlds smallest woman record

worlds smallest woman record : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अत्यंत अभिमानास्पद घटना नुकतीच घडली आहे. चंद्रपूरची कन्या धन्यनेश्वरी दुणेदार हिने केवळ आपल्या जिल्ह्याचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे नाव जागतिक स्तरावर नेले आहे. तिच्या फक्त २.३ फूट (2.3 फूट) उंचीमुळे तिचे नाव International Book of Records मध्ये ‘Smallest Woman in the World’ म्हणून अधिकृतपणे नोंदविण्यात आले आहे.

यशाचा प्रेरणादायी प्रवास

धन्यनेश्वरीचा हा प्रवास एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. तिच्या या विक्रमी नोंदणीमध्ये अलंकार सावळकर (प्रोप्रायटर – सावळकर मेडिकल्स अँड फार्मास्युटिकल्स) आणि योगेश दे. गोखरे (आम आदमी पार्टी, चंद्रपूर महानगर अध्यक्ष) यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. Chandrapur proud achievement

जिल्ह्यात भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

एका योगायोगाने अलंकार सावळकर आणि योगेश गोखरे यांना धन्यनेश्वरी रस्त्यावर भेटली. तिच्या अतिशय कमी उंचीची जाणीव झाल्यावर त्यांनी तात्काळ तिची उंची मोजली. धन्यनेश्वरीची ही उंची जागतिक विक्रम ठरू शकते, हे लक्षात येताच, त्यांनी तिचे नाव International Book of Records मध्ये नोंदवण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केले. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि अखेर धन्यनेश्वरीचे नाव जागतिक विक्रमांमध्ये नोंदले गेले.

जिल्हाधिकारींच्या हस्ते सन्मान

या ऐतिहासिक क्षणाच्या सन्मानार्थ, चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते धन्यनेश्वरी दुणेदार हिला अधिकृत सर्टिफिकेट आणि मेडल प्रदान करण्यात आले. हा सन्मान म्हणजे तिच्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण होता.

“माझी कमजोरीच माझी ताकद बनली” – धन्यनेश्वरी दुणेदार

हा किताब मिळाल्यानंतर धन्यनेश्वरी दुणेदार अतिशय भारावून गेली होती. ती म्हणाली, “मला कधी वाटले नव्हते की माझी कमजोरीच माझी ताकद बनेल.” तिने अलंकार सावळकर आणि योगेश गोखरे यांचे विशेष आभार मानले. “अलंकार दादा व योगेश दादा यांच्या मदतीने मला हा किताब मिळाला आहे. माझे आई-बाबा आणि संपूर्ण कुटुंब आज खूप आनंदी आहे. आम आदमी पार्टी, चंद्रपूर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतःच्या हस्ते सन्मान दिल्याबद्दल मी मनःपूर्वक आभार मानते,” अशा भावना तिने व्यक्त केल्या.

कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

या महत्त्वपूर्ण सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात अलंकार सावळकर (प्रोप्रायटर – सावळकर मेडिकल्स अँड फार्मास्युटिकल्स), सुनील मुसळे (महाराष्ट्र प्रदेश सहसचिव, आप), मयूर राईकवार (जिल्हाध्यक्ष, आप), राजू कुडे (युवा जिल्हाध्यक्ष, आप), योगेश दे. गोखरे (महानगर अध्यक्ष, आप), तब्बसूम शेख (महिला अध्यक्ष, आप), एकनाथ खांडेकर सर (शिक्षण आघाडी अध्यक्ष, आप) आणि संतोष बोपचे (संघटन मंत्री, आप) यांचा समावेश होता. तसेच, धन्यनेश्वरीचे आई-बाबा, तिचे नातेवाईक आणि आपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धन्यनेश्वरी दुणेदारच्या या विक्रमामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव आता केवळ राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने चमकले आहे. तिच्या जिद्द आणि या विक्रमी नोंदणीसाठी मदत करणाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे तिला हे यश मिळाले आहे.

Leave a Comment