Chandrapur Foreign Liquor Seized
Chandrapur Foreign Liquor Seized : चंद्रपूर ३ ऑक्टोबर २०२५ – २ ऑक्टोबर गांधी जयंतीला देशभरात ड्राय डे असतो त्यानंतरही काहीजण अवैधरित्या दारूची विक्री करतात, असाच एक प्रकार चंद्रपूर शहरातील एकोरी वार्डात घडला. पोलिसांनी यावेळी १ लाख ५४ हजार ४९० रुपयांचा विदेशी दारूसाठा पकडला.
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने पकडला देशी दारूचा साठा
२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त ड्राय डे असतो, त्यानंतरसुद्धा छुप्या पद्धतीने दारू विक्री केल्या जाते, चंद्रपूर शहरातील एकोरी वार्डात छुप्या पद्धतीने दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटें यांना मिळाली.
घरून सुरु होती दारूविक्री
माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी एकोरी वॉर्डातील ५६ वर्षीय सुनीलकुमार राजकुमार मुल्ले यांच्या राहत्या घरी धाड मारली असता त्याठिकाणी विदेशी दारूचा १ लाख ५४ हजार ४९० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. शहर पोलिसांनी आरोपी मुल्ले ला अटक करीत महाराष्ट्र दारी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात शार पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि कोलटें, निकोडे, पोलीस कर्मचारी लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, सचिन बोरकर. निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, रुपेश पराते, प्रफुल भैसारे, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, दीपिका झिंगरे व सारिका गौरकार यांनी केली.
