crime news Maharashtra house robbery । रामनगर पोलीस हद्दीत घरफोडी; एक आरोपी अटकेत, साथीदार फरार

crime news Maharashtra house robbery

crime news Maharashtra house robbery : (२ ऑक्टोबर २०२५) – चंद्रपूर: स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या एका घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

३१३ किलोग्रॅम अंमली पदार्थाचा साठा नष्ट

कारवाईचा तपशील

गुन्हा नोंद: रामनगर पोलीस ठाण्यात अप क्र. ७६५/२०२५, कलम ३०५(अ), ३३१(३), ३३४(४) भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Gold rings worth 1.5 lakh recovered burglary

अटक आरोपी:

कामरान कदीर शेख, वय २४, रा. रहमतनगर वॉर्ड, चंद्रपूर

फरार आरोपी:

नमीर नजीर शेख, वय २३, रा. रहमतनगर वॉर्ड, चंद्रपूर (फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.)

जप्त माल:

५ नग सोन्याच्या अंगठ्या, अंदाजे वजन १५ ग्रॅम.

किंमत: रु. १,५०,०००/-

कसे पकडले?

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रोव्हिजन जुगार आणि गुन्ह्यातील पाहिजे आरोपींच्या शोधार्थ चंद्रपूर शहर परिसरात गस्त घालत असताना, त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. कामरान शेख नावाचा एक संशयित इसम सराफा बाजार, चंद्रपूर येथे सोन्याचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात फिरत असल्याची ही माहिती होती.

पथकाने तत्काळ त्या इसमाला ताब्यात घेऊन विचारपूस केली. चौकशीदरम्यान, आरोपी कामरान शेख याने आपला साथीदार नमिर नजीर शेख याच्या मदतीने दिनांक १८/०९/२०२५ रोजी एका बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीच्या कबुलीवरून पंचांसमक्ष चोरीस गेलेला १,५०,०००/- रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक आरोपी आणि जप्त करण्यात आलेला माल पुढील कायदेशीर कारवाईसाठी रामनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची यशस्वी कारवाई चंद्रपूर उपविभागाच्या कारवाई पथकाने केली. पोलीस आता या गुन्ह्यातील फरार आरोपी नमिर शेख याचा कसून शोध घेत आहेत.

Leave a Comment