Maharashtra narcotics disposal drive । चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई! ३१३ किलो अंमली पदार्थांचा नाश

Maharashtra narcotics disposal drive

Maharashtra narcotics disposal drive : चंद्रपूर (१ ऑक्टोबर २०२५) – राज्य शासनातर्फे १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत अंमली पदार्थाचा नाश करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात आली होती, सदर मोहिमेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण १७ दाखल गुन्ह्यातील ३१३ किलो ९३६ ग्राम अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.

बाबुपेठ अपघातावरून पोलीस आणि आप आमनेसामने

३०५ किलो गांजा सह ८ किलो डोडा

न्यायालय चंद्रपूर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची परवानगी घेत, महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड बुटीबोरी नागपूर मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल १६ गुन्ह्यांमधील ३०५ किलो ८८६ ग्राम गांजा व १ गुन्ह्यातील ८ किलो ५० ग्राम डोडा पावडर असे एकूण १७ गुन्ह्यातील अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस कर्मचारी अरुण खारकर, प्रमोद डंभारे, सुधीर मत्ते, दीपक डोंगरे, प्रदीप मडावी, अमोल सावे, मिलिंद टेकाम यांच्या उपस्थितीमध्ये ३० सप्टेंबर रोजी अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.

Leave a Comment