Prajakta Mali speech on Sudhir Mungantiwar | चंद्रपूरच्या विकास कामांची प्राजक्ता माळीने घेतली दखल, मुनगंटीवारांचा गौरव

Prajakta Mali speech on Sudhir Mungantiwar

Prajakta Mali speech on Sudhir Mungantiwar : मुल २ ऑक्टोबर २०२५ -‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्राजक्ता माळी तुमच्या चेहऱ्यावर जे हास्य आणतात, तेच हास्य मॉं दुर्गादेवी आणि माता महाकालींनी तुमच्या चेहऱ्यावर सदैव ठेवावे. नवरात्रोत्सव चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी आहेच, पण कृती अशी करा की माझ्या आणि तुमच्यामुळे वंचित आणि गरीबांच्या चेहऱ्यावरही हास्य उमटले पाहिजे. गरिबांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच माझ्या कामाचे समाधान आहे, अश्या भावना राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा जिल्हाधिकारी गौडा यांनी घेतला आढावा

मुल येथे आयोजित ‘भाऊंचा गरबा’ महोत्सवात ते बोलत होते. यावेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ सदस्य प्रकाश धारणे, रत्नमाला भोयर,नंदू रणदिवे, प्रभाकर भोयर, हरीश ढवस, चंद्रकांत आष्टणकर, अखिल गांगररेड्डीवार, अमोल चुदरी,प्रशांत बोबाटे, सूरज मांदाडे, रुपेश निकोडे, राकेश ठाकरे,विद्या बोबाटे,भावना चौखुंडे भाजपा मुल शहर व ग्रामीणचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Prajakta Mali Bhaucha Garba Chandrapur

आ. मुनगंटीवार यांनी कार्तिकी प्रभाकर भोयर आणि जान्हवी नंदू रणदिवे या दोघींनी अतिशय नियोजनबद्ध महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी एकदा येथे आल्या होत्या. तेव्हा त्यांनी मुल शहराचे भरभरून कौतुक केले. येथील लोक खूप चांगले आहेत, असे त्या म्हणाल्या. माझ्याही मतदारसंघात असंच काम करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला तेथे यावं लागेल आणि तुम्ही या, असे म्हणत त्यांनी या शहराचं महत्त्व विषद केलं होते.’

चंद्रपुरातील लोक हे सोन्यासारखे आहे

‘जेव्हा भारत आणि चीनचं युद्ध सुरू झालं, तेव्हा स्व. यशवंतराव चव्हाण हिमालयाच्या मदतीला धावून गेले. तेव्हा याच मुलचे कर्मवीर स्व. मा. सा. कन्नमवार सह्याद्रीच्या मदतीला धावून गेले. ते मुख्यमंत्री झाले. तेव्हा भारत- चीनच्या युद्धासाठी शस्त्र घ्यायची आहेत आणि त्यासाठी पंडित नेहरूंनी सुवर्णदान करा असे आवाहन केले. तेव्हा देशात सर्वात जास्त सोनं दान करणारा जिल्हा चंद्रपूर होता. येथे केवळ सोनं दान करणारी लोक नाहीत, तर सोन्यासारखी लोक आहेत,’ असे म्हणत आमदार मुनगंटीवार यांनी गौरव केला. Sudhir Mungantiwar achievements

prajakta mali bhaucha garba chandrapur

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आपल्या भाषणात आ. मुनगंटीवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्या म्हणाल्या, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ चंद्रपूर जिल्ह्यासाठीत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी भरपूर काम केले आहे. संपूर्ण देशाला हेवा वाटावा, असं बॉटनिकल गार्डन येथे आहे. वन खात्यासाठी, ताडोबासाठी त्यांनी केलेलं काम सगळ्यांना माहिती आहेच. टाटा कॅन्सर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, आर्थिक, आरोग्य, सांस्कृतिक, वने सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव कार्य केले आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. Chandrapur political news 2025

आ.सुधीर मुनगंटीवार यांना विकासपुरुष का म्हटलं जातं?

त्या पुढे म्हणाल्या, ‘आ.सुधीर मुनगंटीवार यांना विकासपुरुष का म्हटलं जातं याची प्रचिती चंद्रपूर जिल्ह्यातील विकास बघून येते. त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे मी प्रेरीत झाले आहे. मुल शहरात येत असताना चौपदरी सिमेंटचे रस्ते बघितले. या शहरात सुंदर, सुसज्ज नाट्यगृह, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, सिंचन सुविधा आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.’ Prajakta Mali speech on Sudhir Mungantiwar

आमदार श्री. मुनगंटीवार यांच्यासोबत माझी पहिली भेट नागपुरात झाली होती. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि माॅं जिजाऊंवर भाषण दिले होते. ते भाषण ऐकून मी थक्क झाले. कारण इतिहासाचा इतका दांडगा अभ्यास असलेला नेता मी पहिल्यांदा पाहिला. त्यांनी फक्त भाषणच दिले नाही, तर आपल्या कृतीतून या आदर्शांवर प्रत्येक पाऊल टाकत छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं त्यांनी लंडनहून मातृभूमीत परत आणून दाखवली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि देशप्रेम ओतप्रोत भरून असलेलं एकत्रित रसायन म्हणजे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार आहेत.आमदार मुनगंटीवार या जिल्ह्याचे नेतृत्व करतात आणि मी येथे राहात नाही, याचे दुःख आहे. तुम्ही लोक भाग्यवान आहात. मला तुमचा हेवा वाटतो, असेही प्राजक्ता माळी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Leave a Comment