Rajura police quick action robbery । ४ तासात पोलिसांनी केली आरोपीना अटक, वाहनचालक निघाला मास्टरमाइंड

Rajura police quick action robbery

Rajura police quick action robbery : राजुरा २ ऑक्टोबर २०२५ – मार्केटिंगची रोख रक्कम घेऊन राजुरा हायवे रोडने येत असताना अनोळखी ३ व्यक्तींनी लोखंडी रॉड चा धाक दाखवीत तब्बल ९३ हजारांची रक्कम पळविली, याबाबत राजुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली असता पोलिसांनी अवघ्या ४ तासात आरोपीना अटक केली.

घरफोडीच्या आरोपीला अटक, साथीदार फरार

२४ सप्टेंबर रोजी ५५ वर्षीय हंसराज किसनराव दिघाडे राहणार तुकूम चंद्रपूर हे गडचांदूर वरून मार्केटिंगची रोख रक्कम घेऊन चारचाकी वाहनाने आपल्या चालकासोबत येत असताना राजुरा हायवे रोडवर अनोळखी ३ व्यक्तींनी वाहन थांबवित लोखंडी रॉड चा धाक दिघाडे यांना दाखवीत त्यांच्याजवळील रोख रक्कम जबरीने पळविली.

वाहनचालक निघाला मास्टरमाइंड

याबाबत दिघाडे यांनी राजुरा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली, पोलिसांनी गुन्हा दाखल करताच तपास सुरु केला असता आधी वाहन चालकाची विचारपूस केली असता त्याने आपल्या साथीदारांसह कट रचत हा गुन्हा केला असल्याचे कबूल केले. पोलिसांनी या प्रकरणात २३ वर्षीय सौरभ देविदास निलेवार, २५ वर्षीय जाकीर सादिक शेख, २४ वर्षीय अरबाज जाकीर शेख व २६ वर्षीय मुजाहिद आव्हाद शेख सर्व राहणार चंद्रपूर यांना अटक केली. Road robbery case police update

आरोपीकडून पोलिसांनी चोरी केलेल्या रोख रकमेपैकी ४२ हजार ३०० रुपये सह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी किंमत ७० हजार असा एकूण १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात सपोनि हेमंत पवार, पोउपनि दीपक ठाकरे, पोलीस कर्मचारी किशोर तुमराम, विक्की निर्वाण, रामेश्वर चहारे, महेश बोलगोडवार, शफिक शेख, आनंद मोरे, बालाजी यामजवार, शरद राठोड व राजू दुबे यांनी केली.

Leave a Comment