Ramnagar police misconduct case । पोलिसांची दादागिरी?, पोलीस निरीक्षकांवर गंभीर आरोप, पोलीस म्हणतात; आमची कारवाई कायद्याच्या चौकटीत

Ramnagar police misconduct case

Ramnagar police misconduct case : चंद्रपूर (१ ऑक्टोबर २०२५) – मंगळवारी शहरातील बाबूपेठ परिसरातील साईबाबा मंदिर ते जुनोना चौक या अत्यंत गर्दीच्या परिसरात एका थार चालकाच्या बेजबाबदारपणामुळे एका 3५ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसरातील रहिवासी संतप्त झाले.

बाबुपेठ मध्ये अपघात, युवकाचा मृत्यू, पोलिसांनी पकडले आप जिल्हाध्यक्षाचे कॉलर

आप युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी रस्ता रोको करून विविध मागण्या मांडल्या. तेव्हा रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अनादरपूर्ण कुडे यांचेशी वर्तन करत थोड्या अंतरापर्यंत ओढत नेले. परिणामी रहिवासी आणि आप पदाधिकायांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. संबंधित पोलीस अधिकारी शेख यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेद्वारे कुडे यांनी पुलिस प्रशासनाकडे केली आहे. road accident protest Chandrapur

काही वर्षांपूर्वी याचं मार्गावर अपघात

पत्रकार परिषदेत राजू कुडे यांनी सांगितले की, साईबाबा मंदिर ते जुनोना चौक या रस्त्यावर शालेय विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांची ये-जा असते. काही वर्षांपूर्वी याच रस्त्यावर एका वडिलांसोबत ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकायांकडे रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवण्याची वारंवार मागणी करण्यात आली होती, परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

१० लाख रुपयांची मदत द्या

मंगळवारी दुपारी थार वाहन क्रमांक एमएच 34 सीजे 1455 चा चालक भाजपा युवा मोर्चा आघाडी चा उपाध्यक्ष यांच्या निष्काळजीपणाने वाहनाचा दरवाजा उघडल्याने दुचाकी चालक राकेश तेलंग यांचा तोल गेला आणि मागून येणाया बसच्या मागील चाकात येऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उडाली. या घटनेची माहिती मिळताच आप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी रस्त्यावर चक्का जाम आंदेालन करत स्पीड ब्रेकर बसवण्याची आणि मृताच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

घटनास्थळी रामनगर पोलिस निरीक्षक आसिफ रझा शेख पहुचले व आंदोलकांचे म्हणणे न ऐकता दादागिरी दाखवत उध्दटपणे आपचे पदाधिकारी राजू कुडे यांची कॉलर धरून गैरवर्तन केले. रामनगर पोलिसांनी कुडे यांना ताब्यात घेतल्यानंतर भाजपा च्या पदाधिकायांचा थार वाहनचालकावर कारवाई न करण्यासाठी पोलिस अधिकायांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप कुडे यांनी केला. police officer harassment allegation

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रामनगर पोलिसांनी रात्री उशिरा थार वाहनचालकावर गुन्हा दाखल केला. तथापि, सार्वजनिक न्यायासाठी लढणायांशी पोलिस अधिकायांचे अनादरपूर्ण वर्तन पाहून पत्रकार परिषदेत पोलिस प्रशासनाचा निषेध करण्यात आला. कुडे यांनी रामनगर पोलिस अधिकायांवर वाळू तस्करांना अटक करण्याऐवजी त्यांच्याशी सौम्य वर्तन केल्याचा आरोपही केला.

पत्रकार परिषदेद्वारे कुडे यांनी रामनगर पोलिस अधिकारी शेख यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष मयूर रायकवार, राजू कुडे, सुनील मुसळे आदी उपस्थित होते.

पोलीस म्हणतात आम्ही कायद्याच्या चौकटीत…

या संपूर्ण प्रकरणावर रामनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आसिफ राजा शेख म्हणाले कि मृतकाचे कुटुंब व आप चे राजू कुडे यांनी जे आंदोलन सुरु ठेवले होते, त्यामुळे इतर वाहनधारकांना त्रासाचा सामना करावा लागला, आम्ही या प्रकरणी एसटी बस व थार वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहे. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून परिसरातील शांतता भंग न व्हावी याकरिता कायदेशीर मार्गाचा वापर केला. राजू कुडे यांनी आमच्यावर केलेले आरोप पूर्णतः खोटे आहे.


Leave a Comment